केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेची कार्यकारीनी बैठक यशस्वी रित्या संपन्न

इचलकरंजी येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पत्रकार संपादक संघटनेच्या वातीने बैठक घेण्यात आली तसेच मान्यवरांने आपले विचार मांडले व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिगाडे यांनी महत्वाचे विषय हाती घेतले तसेच केंद्रीय  संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी सघटनेच्या राष्ट्रीय सदस्या  व पोलीस मित्र संघटनेच्या महिला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा आणि राष्ट्रवादी  युवती उपाध्यक्ष कुमारी मोनिका जाधव यांचे वाढदिवसाचे औचित साधून आज इचलकरंजी येथे केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेची बैठक घेण्यात आली. 
 सदरची ही बैठक प्रहार न्यूज चे उपसंपादक तथा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नागराज हजारे यांनी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या आदेशाने  केले होते.
 या बैठकीवेळी  नागराज हजारे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. 
 आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी अनेक महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर कित्येकांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. 
 त्या सर्व महात्म्यांना अभिवादन करून  नागराज हजारे यांनी कार्यक्रमाची पुढील सूत्रे जनतेचा अधिकार नामा चे मुख्य संपादक  संदीप पाटील सर यांच्याकडे संपवली. 
 यावेळी  संदीप पाटील सर यांनी आजच्या कार्यक्रमास आलेले सेवानिवृत्त जवान  शिवाजी चव्हाण यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की आम्ही केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटना एका विशेष उद्देशाने स्थापन केले आहे. 
 समाजात पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक पत्रकारांना समानतेची वागणूक मिळत नाही.
 बऱ्याच पत्रकारांवर जीव घेणे हल्ले केले जातात. 
 अनेक युवक युवतींची पत्रकार म्हणून काम करण्याची इच्छा असताना त्यांना कोठे संधी मिळत नाही. 
 शासन दरबारी प्रत्येक व्यवस्थेसाठी योजना राबविल्या जात असताना पत्रकारांसाठी कोणत्याही प्रकारची योजना शासन दरबारी राबवली जात नाही. 
 यासाठी आपल्या केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून अशा बऱ्याच गोष्टीसाठी प्रयत्न करता यावे यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. 
 समाजातील काही संघटना तळागाळापासून काम करत असताना त्यांच्या विचारांची प्रामाणिकपणे प्रसार व्हावा यासाठी आमचे संघटना मोठ्या उत्साहाने काम करते. 
 असे अनेक उद्देश्य यावेळी संघटनेच्या मान्यवरांशी बोलताना जनतेचे अधिकार नामाचे मुख्य संपादक संदीप पाटील आपल्या मनोगतातून सांगत होते.
  यावेळी सदरच्या कार्यक्रमासाठी. 
 सेवानिवृत्त जवान  शिवाजी चव्हाण 
 संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे 
 जनतेचा अधिकार नामाचे मुख्य संपादक  संदीप पाटील 
 ग्रामदेवता चे मुख्य संपादक  सखाराम जाधव 
 प्रहार न्यूज चे उपसंपादक नागराज हजारे. 
 प्रीती ताई कोळी. वंदनाताई कोरे. 
 मोनिकाताई जाधव. मधुताई धनवडे रूपालीताई चव्हाण 
 विनोद धनवडे अधी मान्यवर उपस्थीत होते कार्यक्रमाचे आभार प्रिती कोळी यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.