बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधि कारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचा निषेध मोर्चा गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी.
शिवाजी शिंदे
सेलू : आज दि.21 रोजी महाराष्ट्रामध्ये बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत निंद नीय मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे, तीन ते चार वर्ष वयो गटाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत कार्यरत असलेल्या एका कर्मा चाऱ्यांने अत्याचार केला,आणि त्या पी डित मुलीच्या आई- वडिलांनी जेव्हा संबं धित पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यां ना 12 ते 13 तास ब सून ठेवलं यामुळे नागरिकांमध्ये पोलि सांच्या विरोधात रोष तयार झाला आणि नागरिकांनी तीव्र आंदो लन केले त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उम टले आहे, तर सरकार वेगवेगळे इव्हेंट निवड णुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार करण्यात मग्न आहे. आमच्या माय बहिणींना तुमची तुटपुंजी मदत नको पा हिजे ती सुरक्षा अशा शब्दात सरकारला प्रत्यु त्तर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी शेकडो कार्यक र्त्यांना घेऊन आज बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 30 वाजेच्या सुमारास परभ णी जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकार विरोधात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदो लन करत परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली, बदलापूर येथे घटनेचा निषेध करणा ऱ्यांवर दाखल कर ण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. या आंदोलनात शिव सेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख विशाल कदम , डॉक्टर विवेक नावंदर , संजय साडेगावकर , पंढरीनाथ घुले, गंगा प्रसाद आनेराव,अनिल जाधव, अंबिका डहा ळे, सुरेखा टाले, शोभा ईकर, गीता पुरी, आदीं सह पदाधिकारी कार्य कर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
टिप्पण्या