ऑडिटर शिवाजी परीट यांचा सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सत्कार

कोल्हापूर 
           महाराष्ट्र राज्य अधिकृत असोसिएशनचे सदस्य शिवाजी परिट यांची कामाची दखल घेऊन सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी परिट यांचा विशेष सत्कार केला.यावेळी ध्वजारोहण धर्मादाय सह आयुक्त श्रीमती निवेदिता पवार यांच्या हस्ते, धर्मादाय उपायुक्त    कांचनगंगा सुपाते-जाधव, सहाय्यक आयुक्त वाळके ,अधिक्षक शिवराज नाईकवाडे व सहाय्यक धर्मादाय आयुक्त मधील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या वेळी विविध मान्यवरांचा सत्कार सन्मान  चिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार  करण्यात आला. अधिकृत लेखापरीक्षक यांनी ऑफिसमध्ये केलेल्या कामाची नोंद घेऊन राज्य अधिकृत ऑडिटर असोसिएशन सदस्य श्री शिवाजी परीट यांच्यासह वासुदेव  कोष्टी, रमेश माळी,श्रीकांत पाटील, संदीप जोशी,श्रीकांत चिंडक, गुरुनाथ कुरणगे, पुंडलिक भिंगुडे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यालयीन  सेवक वर्ग, वकील, आणि अधिकृत लेखापरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवपदी धर्मादाय कार्यालयाचे अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांची निवड झाल्याबद्दल अधिकृत लेखापरीक्षक यांच्यावतीने राज्य असोसिएशनचे सदस्य शिवाजी परीट यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संगीत खुर्ची तसेच देश पर गीते गायली गेली.उपस्थितांचे आभार निरीक्षक भुइंबर यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.