रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) कोरेगाव तालुका व अण्णा भाऊ साठे नगर कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट, अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी
कोरेगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) कोरेगाव तालुका व अण्णा भाऊ साठे नगर कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी दिली. यावेळी जयंती कार्यक्रमास मा.आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब, आर पी आय युवक तालुका उपाध्यक्ष ऋतुराज वायदंडे,नगरसेवक हेमंत बर्गे, नगरसेव गणेश धनवडे,आर पी आय तालुका कार्याध्यक्ष पंकज जावळे, जिल्हा सचिव महिला वनिता खवळे, तालुका अध्यक्ष मनीषा सोनवणे, महिला तालुका उपाध्यक्ष पूजा साळुंखे, कोरेगाव शहर अध्यक्ष धनश्री भिसे, प्रकाश कांबळे, प्रशांत अवघडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवर यांनी प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी म्हणाले, थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचे कार्य एका जातीपुरते नाही तर सर्व शोषित वंचित समाजासाठी होते. अण्णा भाऊ साठे यांना एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक असे ओळखले जाते. सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे ठरले आहे. त्यानंतर अण्णा भाऊ साठे नगर मधील कार्यकर्त्यानकडून महापुरुषांच्या मोठ मोठ्या घोषणा बाजी करण्यात आल्या, यावेळी कार्यक्रमास महिला, तरुण मुलं, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, यांनी जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा नंबर २ कोरेगाव या ठिकाणी भेट देऊन जयंती निमित्त गरजू विद्यार्थी व हुशार विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप व मतिमंद शाळेत भेट देऊन त्यांना खाऊ वाटप केले,
व अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल बोतालजी, मयूर बोतालजी, राजू बोतालजी, आदित्य माने अमोल बोतालजी, अभिजित बोतालजी, स्वप्नील माने, चंद्रकांत बोतालजी, सागर सकट, निलेश बोतालजी, सागर बोतालजी, चैतन गायकवाड, गणेश साळुंखे, विकी बोतालजी, गौरव बोतालजी, ओमकार बोतालजी, आकाश बोतालजी, सोमनाथ बोतालजी, निखिल येवले, आकाश बोतालजी, आशिष येवले, साहिल येवले, पारस बुधावले, सागर बोतालजी, अनिष बोतालजी, वीर बोतालजी, नेता धनगर, आकाश येवले, कार्तिक कांबळे, निखिल येवले, बाबू येवले, सागर सकट, आदित्य उल्मीक, समीर सरगडे, सुनील पाटे, कुणाल बोतालजी या सर्वांनी अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अदिक परिश्रम घेतले.
टिप्पण्या