माननीय श्री महेश गोविंद जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

इचलकरंजी - टाकवडे येथील श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवा संस्था ट्रस्ट यांच्यावतीने दिनांक 25 8 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री दत्त संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व मासिका ,  दैनिकांमध्ये व साप्ताहिक मध्ये जाहिरात देण्यात आली होती .की समाजातील लोकांचे आपण काही देणे लागतो  आपण समाजासाठी काय केले आहे .समाजाच्या हिताच्या साठी सर्वच क्षेत्रांमध्ये नावलौकिक केले असलेले लोकांनी प्रस्ताव पाठवावा. अशी जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून महेश जोशी यांनी आपला प्रस्ताव पाठवला. ते एल.आय.सी. जीवन विमा चे काम करतात व त्यांनी प्रस्ताव पाठवला. ज्यावेळी प्रस्ताव त्यांचा श्री दत्त दिव्यांग संस्थेच्या कमिटीकडे आला त्यावेळी कमिटीने त्यांना फोन करून त्यांची मुलाखत घेतली .त्यावेळी त्यांनी दिलेल्या मुलाखतीच्या उत्तरांच्या आधारावर निवड समितीने असे ठरवले .की श्री महेश जोशी हे भलेही एल.आय.सी चे काम करतात त्यांच्या या कामामुळे त्यांचे देखील दिनचर्या चालते. व एलआयसी देखील समाजसेवेचे काम करते. व त्यांनी आजपर्यंत एलआय.सी.मार्फत समाजासाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊन निवड समितीने सर्वानुमते महेश जोशी यांना आदर्श सेवा रत्न पुरस्काराची निवड पत्र देऊन त्यांना आमंत्रित केले . व त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी महेश जोशी हे बोलताना म्हणाले  श्री दत्त संस्थेचे समाजासाठी केलेले कार्य हे अतुलनीय आहे .त्यासाठी माझा एक खारीचा वाटा म्हणून त्यांनी संस्थेला पाच हजार रुपये देणगी लगेच जाहीर केली. तसेच त्यांनी त्यांच्याकडून घेतलेल्या एल.आय.सी .पॉलिसी धारकांना देखील आव्हान केले की तुम्ही देखील दिव्यांग व निराधार लोकांसाठी काहीतरी देणगी देऊन एक समाज हिताचे काम करा.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी त्यांचे खूप खूप आभार मानले. व त्यांचे कौतुक देखील केले. यावेळी जोशी सरांनी अशी ग्वाही दिली की. ज्या ज्या वेळी दिव्यांग व निराधार लोकांसाठी माझी गरज पडेल त्या त्यावेळी मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. त्यांच्या या बोलण्यामुळे इतर समाजातील लोकांना देखील प्रेरणा मिळाली सर्वांनीच त्यांचे खूप खूप कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.