एसटीचे बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांची वाहतुक अधीक्षक पदी निवड; कामगार - कर्मचाऱ्यांकडून सत्कार

नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार मध्यवर्ती बसस्थानक प्रमुख मा. श्री. मासीन हमीद खान यांची वाहतुक निरीक्षक (टी. आय.) पदावरुन बढ़ती होऊन आता ते सहाय्यक वाहतुक अधीक्षक (ए.टी.एस.) या पदावर रा.प.म. नांदेड आगारात रुजू होऊन पदभार स्वीकारल्याबद्दल एसटी नांदेड आगार कामगार- कर्मचा-यांच्यावतीने त्यांचा एसटी कामगार संघटनेचे आगार सचिव मा.श्री. एम.डी. गौस यांच्या हस्ते त्यांचा पुष्पहाराने हृदय साकार करुन पेढा भरवून अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन

आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, मा.श्री. यासीन हमीद खान हे आगारातील कामगार कर्मचान्यांमध्ये समन्वय ठेवून आपले दैनिक कर्तव्य पार पाडत असतात, असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, खान साहेब हे स्मितहास्य, मृदू स्वभाव असं एक आगळं वेगळं व्यक्तीमत्त्व असून भविष्यात कामगार कर्मचायांचे प्रश्न अडीअडचणी समजून घेऊन कामगारांना सहकार्य करतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून कामगार संघटनेचे आगार सचिव एम.डी. गौस, चाहतुक निरीक्षक मोबीन शेख, वाहतुक नियंत्रक प्रविण दामेरा, जगन्नाथ ढगे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, लिपीक सुरेश फुलारी, चालक राजू उल्लेवार, कुलदीपसिंध हिरासिंध चव्हाण, वाहक शिवदास आसोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास आगारातील कामगार कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.