अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. कल्लेश्वर मित्र मंडळ मधील जुन्या व नव्या सदस्यांची नवी संकल्पना

अकिवाट वार्ताहर - 71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात होणारा आजचा श्रावण सोमवार कल्लेश्वर मित्र मंडळ, सैनिक टाकळी यांना भाग्याचा होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे, "जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत, अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. कल्लेश्वर  मित्र मंडळ मधील जुन्या व नव्या सदस्यांनी एक संकल्पना मांडली की,  पूरग्रस्त शिरोळ तालुका यामध्ये गुरुदत्त साखर कारखाना येथे छावणीमध्ये वास्तव्य करत असलेल्या लोकांच्यासाठी आजचा श्रावण सोमवार बडा खाण्यापेक्षा कमी नव्हता. मंडळातील सर्व सदस्यांनी महिलांना निरोप देऊन प्रत्येक घरटी 25, 25 चपात्या बनवून संध्याकाळचं रात्री भोजन त्यांच्याबरोबर केलं. आणि त्यांना उत्साहीत केलं, या अनमोल कार्यामध्ये कल्लेश्वर मित्र मंडळ आजी माजी सदस्य महिला आणि मार्गदर्शक यांची मोलाची कामगिरी होती. मी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि अशीच कामे आपल्या सर्वांच्या हातून यापुढेही  होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
कॅप्टन प्रकाश खोत (सेवानिवृत्त)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.