खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर, संचलित. खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलनाने झाली.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा व पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थी श्रेयस नाईकवाडे,इयत्ता 9 वी याने लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रा विषयी माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.तसेच कु.राधिका रेडेकर,इयत्ता 10 वी हिने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. तसेच विद्यालयातील 8 वी चा विद्यार्थी सर्वेश सोनुरे याने लोकमान्य टिळक यांची वेशभुषा सादर केली. तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.एस.के.हेमगिरे यांनी केले तर आभार श्री.सी.बी.समाजे यांनी मानले.
टिप्पण्या