कवि सरकार इंगळी यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार जाहीर., वांद्रा मुंबई येथे होणार सन्मान .

हातकणंगले प्रतिनिधी

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ साठी हातकणंगाले तालुक्यातील इंगळी गावचे प्रसिद्ध पत्रकार लेखक कवि सरकार( विलास पाटील ) इंगळी यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .
   कवि सरकार इंगळी यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . मुंबई वांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह स्वामी विवेकानंद रोड एसव्ही रोड येथे २५ ऑगस्टला मान्यवरांच्या हस्ते देणेत येणार आहे . असे निवडपत्र त्यांना मुख्य संयोजक समितीचे पदाधिकारी यांना दिले आहे . मा नागेश हुलावळे ' संस्थापक वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई . नॅशनल लायब्ररी ' डि पी .ई सोसायटी वांद्रा नाईट हायस्कूल त्याचप्रमाणे रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर प्रमोद सुर्यवंशी मुंबई योगेश हरणे पुणे व आयोजक समिती सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.