विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार होणे गरजेचे : प्रा के एम भोसलेन्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरमध्ये पालक सभा उत्साहात
शिरोळ : प्रतिनिधी : देशाचा सुजाण नागरिक होण्याकरता आत्तापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर उच्च संस्कार झाले पाहिजेत असे प्रतिपादन विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मेजर प्रा के एम भोसले यांनी केले
विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गाची "मासिक पालक सभा " मोठ्या उत्सहात संपन्न झाली . यावेळी प्रा. भोसले हे बोलत होते
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली .यावेळी पालक प्रतिनिधी जगन चव्हाण सौ. कविता लाड यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक तथा पायाभूत परीक्षा निकाल वाचन शिक्षिका सौ. जयश्री पाटील यांनी केले .शिक्षक नितिन बागुल यांनी एन. एम. एम. एस .या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप व महत्व पालकांना पटवून दिले . त्याचबरोबर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करतांना कोणकोणती कागदपत्रे लागतात याची सविस्तर माहिती दिली.
संस्थेचे सचिव प्रा मेजर के. एम भोसले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले पाहिजेत विद्यार्थ्यांनी योग्य दिशा ठरविली पाहिजे , आताच त्यांना चांगले घडविले पाहिजे तर ते भविष्यात चांगले नागरिक घडतील असे प्रतिपादन केले .पृथ्वीचंद माछरेकर यांनी आभार मानले
टिप्पण्या