स्टेट बँक ऑफ इंडिया सेलू मध्ये ग्राहकाचे दीड लाख रुपये लंपास.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

दोन अज्ञात महिलां विरोधात गुन्हा. 

सेलू : सेलू येथील जवाहर रोड वरील भारतीय स्टेट बँकेत गुरुवारी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास पिक कर्ज भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाची दोन अनोळखी महिलांनी दीड लाखाची रक्कम चोरी करून पलायन केले. पाथरी शहरातील आदर्श नगर मधील चंद्रकांत पिंपळगावकर यांनी महाराष्ट्र बँक पाथरी येथून 2 लाख रुपये उचलले त्यापैकी 40 हजार रुपये त्यांनी आपल्या वाहनाच्या डिक्कीत ठेवून एक लाख साठ हजार रुपये सेलूच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत पिक कर्ज भरण्यासाठी बँकेत आले.बँकेत स्लीप भरताना त्यांच्या बाजूस दोन अनोळखी महिला आल्या.एकीने तोंडाला रुमाल बांधलेला होता तर एकीच्या डोक्यावर साडीचा पदर होता. पिंपळगावकर हे काउंटरवर भरलेली स्लीप देऊन हातातील पिशवीतले पैसे जमा करण्यासाठी शोधत असता त्यांना त्यात पैसे आढळून आले नाही तर पिशवी फाटलेली दिसली.त्यात फक्त दहा हजार रुपये होते.उर्वरित दीड लाख रुपये त्या दोन अज्ञात महिलांनी चोरून नेले असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चंद्रकांत पिंपळगावकर यांच्या फिर्यादीवरून पो.नि. दीपक बोरसे यांनी सेलू पोलीस स्टेशन मध्ये दोन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल केला. बँकेत सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही यंत्रणा असतांनाही भर दिवसा चोरी झाल्या मुळे ग्राहकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.