नाईट कॉलेजचे अधीक्षक सिंकदर पटेल यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार .

यड्राव  ( प्रतिनिधी ) :  पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे आयोजित समारंभात नाईट कॉलेजचे अधिक्षक सिकंदर नजरुद्दीन पटेल यांना आदर्श शिक्षकेतर  कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.. कार्यालयीन कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात आले. यानिमित्ताने महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 
       सत्कार समारंभ प्रसंगी कार्याची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी सिकंदर पटेल यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे अशी भावना व्यक्त केली. तसेच त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.       
यासाठी संस्थेचे चेअरमन अरुणराव खंजिरे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुरदंडे, सचिव शेखर पाटील, युवा नेते राहुलजी खंजिरे तसेच सर्व संचालक यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले. 
           सत्कार प्रसंगी डॉ. विरुपाक्ष खानाज, डॉ. बी. यु. तुपे, डॉ. रविकिरण कोरे डॉ. गणेश खांडेकर, डॉ. माधव मुंडकर, डॉ. सबिहा सय्यद, डॉ. शोभा पौडमल, प्रा. सौरभ पाटणकर, डॉ. प्रवीण पोवार, प्रा. प्रमोद काळे, प्रा. अभिजात पाटील, डॉ. जीवन पाटील, अजित कांबळे, राहील कागवाडे, प्रसाद माने यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ सेक्रेटरी डॉ. रामेश्वर सपकाळ यांनी केले. सदर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा. एफ. एन. पटेल यांनी केले , तर डॉ . सचिन चव्हाण यांनी आभार मानले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.