विद्यार्थ्यांनी सकारात्मक दूरदृष्टी ठेवावी : प्रा के एम भोसले

शिरोळ : प्रतिनिधी : शिक्षणात अमुग्राह बदल होत आहेत यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दूरदृष्टी ठेवून शिक्षण क्षेत्रात गरुड भरारी घेणे गरजेचे आहे यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी  लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मेजर प्रा के एम भोसले यांनी केले
  विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित
न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गाची "मासिक पालक सभा संपन्न झाली यावेळी प्रा भोसले यांनी मार्गदर्शन केले
 मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली .
 पालक प्रतिनिधी सौ. सुप्रिया कांबळे , सौ. फरजाना मुल्ला , सौ. रुपाली सुर्यवंशी  पांडुरंग वरक यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत , प्रास्ताविक करून संस्कार गुरुकुल "उपक्रमाची सौ.जयश्री पाटील यांनी माहिती दिली.
नितिन बागुल यांनी नुकत्याच झालेल्या पायाभूत परीक्षेच्या निकालाचे वाचन केले.सौ. असिया तांबोळी यांनी इंग्रजी विषयाच्या संदर्भात पालकांना संबोधित केले .
मान्यवरांच्या हस्ते " संस्कार गुरुकुल उपक्रम " फाईलचे वाटप करण्यात आले .आभार पृथ्वीचंद माछरेकर यांनी मानले. सुप्रिया दाभाडे , सर्जेराव पोवार , सिद्धार्थ कांबळे , अभिषेक ढोकळे , धनश्री माने यांचे यांचे पालक सभेसाठी सहकार्य लाभले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.