बोरगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी पिंटू कांबळे तर उपनगराध्यक्षा पदी सौ भारती बाळासाहेब वसवाडे यांची बिनविरोध निवड..

बोरगाव/प्रतिनिधी
        गेल्या 33 महिन्याच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत नगराधक्ष  पदासाठी पिंटू तुकाराम  कांबळे यांची तर उपनगरध्यक्ष पदी व सौ भारती वसवाडे यांची अविरोध निवड झाली.त्यामुळे पुन्हा बोरगाव नगरपंचायतीवर उत्तम पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून आले.विजयाची वार्ता पसरताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत,गुलालाची उधळण करत विजोत्सव साजरा केला.निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी काम पाहिले. 
        बोरगाव नगरपंचायत अध्यक्षपदासाठी एससी आरक्षण तर उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी ए महिला आरक्षण निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीवर 17 पैकी 16 जागेवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी एससी मधून पिंटू कांबळे यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी ए मधून सौ भारती वसवाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सदरची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध असल्याची घोषणा निवडणूक अधिकारी  प्रवीण कारंडे यांनी केली. 
         जवळपास गेल्या अडीच  वर्षांपासून नगरपंचायतीमध्ये प्रशासन व्यवस्था असल्याने शहराच्या विकासाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधून राहिले होते.परिणामी 32 महिन्याच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर नगरपंचायतीवर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यामुळे पुन्हा बोरगाव शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही दिसत आहे. 
        याप्रसंगी बोलताना उत्तम पाटील म्हणाले,32 महिन्यानंतर बोरगाव नगरपंचायतीवर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाली. स्व.रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर विकास पॅनलमधून 17 पैकी 16 नगरसेवक आमच्या गटाचे निवडून आले.यासाठी सर्व शहरवासीयांचे मी मनापासून आभारी आहे.नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला मदत केले. या विश्वासाला आपण पात्र राहून पुढील काळात बोरगाव शहर हे एक आदर्श शहर म्हणून करण्याचा आपला मानस आहे.मागील पाच वर्षात ही आपण बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे या ठिकाणी राबविली यासाठीही आम्ही शासनाचे विशेष असे अभिनंदन करतो.व पुढील काळात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी,खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या सहकार्याने शहरासाठी विविध विकास कामे राबविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. विकास कामासाठी त्यांचे सहकार्य आम्हाला लाभणार आहे. अध्यक्षपदासाठी दिगंबर कांबळे संगीता शिंगे व पिंटू कांबळे या तिघांचे नाव चर्चेत होते .पण दिगंबर व संगीता यांनी माघार घेऊन पिंटू यांना संधी द्या असे सांगितले. तसेच उपाध्यक्ष पदासाठीही रूकसाना अफराज यांनी माघारी घेऊन भारती यांना संधी द्या असे सांगितल्याने यापुढे शहराचा विकास झपाट्याने होणार हा आपला विश्वास असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले.
     यावेळी नगरसेवक अभय मगदूम,प्रदीप माळी,दिगंबर कांबळे, जावेद मकानदार,रोहित माने,तुळशीदास वसवाडे,माणिक कुंभार, शोभा हावले,सौ अश्विनी पवार,सुवर्णा सोबाने,वर्षा मनगुते,संगीता शिंगे,रुकसाना अफराज,गिरीजा वठारे,राजू गजरे,प्रशांत कांबळे, सुरेश मधाळे,आश्विन मानवी अशोक माळी, बाबासाब वठारे, प्रमोद वसवाडे,बाबसाब वसवाडे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते नगरपंचायतीचे पदाधिकारी व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .                         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.