निपाणीच्या सर्वांगीण विकासाची आपण कटिबद्ध . निपाणी आमदार शशिकला जोल्ले.

बोरगांव/ प्रतिनीधी                     
   अखंड बेळगांव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगर पालिकेत विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्ता मुळे पुन्हा एकदा निपाणी नगर पालिकेत भाजप चे नगराध्यक्ष, व उपनगराध्यक्ष निवडूण आले आहेत.निपाणी च्या इतिहासात  नगरपालिकेवर सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आणण्यात आपल्याला मोठ  यश आलेलं असून भाजप पक्षाच्या नगरसेविका सोनल कोठाडिया या निपाणीच्या नूतन नगराध्यक्ष्या  व उपनगराध्यक्ष म्हणून संतोष सांगावकर  यांची निवड झालेली असून  येणाऱ्या काळात निपाणी येथील 31 वार्डामध्ये  राज्यात  कोणतेही सरकार  असू दे निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी  आपण कटिबद्ध आहोत, विकास कामाला कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू देणार नाही असे मत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार   सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.  त्या निपाणी येथील  नगरपालिका कार्यालयांमध्ये  नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठाडिया  आणि उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर  यांच्या पदभार  स्वीकारल्यानंतर  आयोजित कार्यक्रमात त्या बोलत  होत्या.      *.              प्रारंभी पालिका आयुक्त दीपक हरदी यांनी स्वागत केले.
  पुढे बोलताना जोल्ले म्हणाल्या की नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पदभार स्वीकारलेला आहे, आत्तापासूनच  निपाणी नगरीच्या विकासाला   गती देऊन  मिळालेल्या पदाचा कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी  आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.. सर्व नगरसेविका  नगरसेवक यांनी  रस्ता गटारी  लाईट पाणी  या गोष्टींच्याकडे लक्ष देऊन  सर्व वार्डातील समस्या निकालात काढण्या संदर्भात प्रयत्न करण्याविषयी  सांगितले.
 यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठाडिया  म्हणाल्या , आपल्यासारख्या महिलेला इतकं मोठं पद मिळालेलं आहे  हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधना मुळेच. येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन अण्णा वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली  काम करत राहणार असल्याचे सांगितले.
  उपनगराध्यक्ष  सांगावकर म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन  निपाणीच्या विकासासाठी  आणि नागरिकांना मूलभूत सुविधा  पुरवण्यासाठी सहकार्य करत राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी  नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनीही मनोगत व्यक्त केले.
  यावेळी  माजी खासदार अण्णासाहेब  जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, नगरसेवक  बाळासाहेब देसाई सरकार, डॉ, जसराज गिरे, जयवंत भाटले, सद्दाम नगरजी. नीता बागडे, सुजाता कदम, पालिका आयुक्त, यांच्यासह भाजप नगरसेवक ,नगरसेविका ,कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.