राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट महिला शहर अध्यक्ष कोरोची पदी सौ दीपा खारगे यांची निवड

प्रतिनिधी नंदिनी चव्हाण कुंभोज
हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट महिला शहर अध्यक्ष कोरोची पदी सौ दीपा खारगे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय इचलकरंजी येथे करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे साहेब उद्योग व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपानी साहेब, माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे साहेब, जिल्हाध्यक्ष कामगार विभाग अभिजीत आवळे साहेब, कोरोची शहराध्यक्ष रवींद्र शिंदे, संतोष पिसे, माणिक चौगुले, फारुक मुजावर, महिला आघाडी इचलकरंजीतील शहराध्यक्ष माजी नगरसेवक सौ माधुरी चव्हाण, शहर कार्याध्यक्ष बिलकिस मुजावर, महिला सचिव प्रियांका कांबळे, अनुराधा पाटील, व पार्टी ऑफिसचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. निवडीनंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.