यड्राव गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे . ः आमदार डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर .

यड्राव (प्रतिनिधी )  :  गावचे हित साधायचे असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधीनी विरोधासाठी विरोध न करता एकत्र येऊन काम केल्यास गावचा विकास होतो राजकारणाच्या वेळी राजकारण करा .पण गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. यामुळेच गावचा सर्वांगीण विकास होतो.असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. 
     येथील रेणुका मंदिर येथे झालेल्या  विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार यड्रावकर व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर होते यावेळी रेणुका मंदिर सभा मंडप पूजन, पडीयार वसाहत येथे विहीर नूतनीकरण, तांडा वस्ती योजनेतून गटर व रस्ता शुभारंभ, गाव चावडी इमारत बांधकाम शुभारंभ, बस थांबा निवारा चे  पाया खुदाई, मराठी शाळा व्हरांडातील फरशी बसवणे ,षटकोन शाळा येथे पत्रे बसविणे, बेघर वसाहतीकडे जाणारा रस्ता करणे आदी विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. 
    स्वागत व प्रास्ताविक सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर यांनी केले यावेळी दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल ,राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडू, नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     यावेळी सरदार सुतार यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी प्रकाश आकीवाटे ,महावीर पाटील , शिवाजी दळवी ,शिवाजी निंबाळकर,मंगल कांबळे, अण्णासाहेब कवाणे, दिलीप पाटील, आनंदराव साने, मोहन प्रभाळकर, दत्तात्रेय साळुंखे, नितीन कांबळे ,दत्तात्रय कोळी , बाबगोंडा पाटील ,परसराम कट्टी ,रंगराव कांबळे, बाबासाहेब राजमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महेश घोटणे यांनी सूत्रसंचालन  केले. माजी सरपंच  उल्हास भोसले यांनी आभार मानले.
फोटो ओळी यड्राव(ता शिरोळ) येथे दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटप प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ,सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, कुणाल सिंह नाईक निंबाळकर महावीर पाटील सरदार सुतार अण्णासाहेब क्वाने, दिलीप पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.