क्रांतीसिंह नाना पाटील हे प्रतिसरकार स्थापन करुन रयतेची सेवा करणारे थोर क्रांतीकारक - गुणवंत मिसलवाड
नांदेड- आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महान क्रांतीकार झाले. १९४२ च्या नंतर ब्रिटीशांविरुद्ध चले जाव चळवळीला प्रारंभ झाला, अशातच क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन करुन आपला कारभार लोकाभिमुख करुन आपणच चालवणे हे ध्येय उराशी बाळगून प्रति सरकारांतर्गत सांगली, सातारा जिल्ह्यातील १५०० खेडीगावातील रयतेची सेवा करणारे थोर क्रांतिकारक म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता झुंजार नेते, पत्री सरकार निर्माते, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, एक धगधगती मशाल क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की, क्रांतीसिंह नाना पाटील यांना जेल झाली. नंतर ते भूमीगल राहून प्रतिसरकारची सूत्रे हलवली. विनोदाच्या गोष्टींनी व तुफान सेना स्थापन करुन युवकांना एकसंघ करुन जनजागृती केली. मुंबई येथील शिवाजी पार्कवर भरलेल्या भव्य अशा मेळाव्यात मराठी पत्रकार प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या कार्याप्रती त्यांना क्रांतीसिंह ही पदवी बहाल केली. संसदेत दोनवेळा खासदार म्हणून मराठीत भाषण देणारे ते एकमेव व्यक्ती होते. अशा या महान विभूर्तीचा तुम्ही आम्ही सर्वांनीच आदर्श घेऊन समाजाप्रती, देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा. श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, लेखाकार सतीश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहर माळगे, हेड कॅशिअर सुमीत महाजन, सुरेश फुलारी, लिपीक सौ. सुनीता हुंबे, रेखा माचीनवार, वैशाली कोकणे, योगीला सुवर्णकार, मनिषा कदम, गुलाम ख्बानी, संतोष देवकांबळे, कृष्णा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आगारातील कामगार कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या