सांगली हादरली...पॅरोलवर बाहेर येताच कुख्यात गुंडाने केले लैगिंक अत्याचार
बदलापूरमधल्या भयंकर घटनेनंतर राज्याच्या विविध भागातून महिलांवर, अल्पवयीन मुलींवर जबरी अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. सांगलीतही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या महिन्यात पॅरोलवर बाहेर आलेल्या संजयने 14 वर्षांच्या एका मुलीला 'तू मला आवडतेस' म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली होती. घडल्या प्रकारामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला नव्हता. यानंतर 23 ऑगस्ट रोजी संजयने या मुलीला एका ठिकाणी बोलावले आणि तिथून तिचे अपहरण करून त्याने स्वत:च्या घरी नेले. तिथे त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराबाबत कोणाला सांगितलंस तर ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली होती. हा प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. ही तक्रार मिळताच पुढच्या दीड तासात पोलिसांनी संजयला शोधून काढत अटक केली. या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय याच्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात याला आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
टिप्पण्या