आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेतील यशवंत खेळाडूंचा गोकुळ दूध संघाच्या वतीने सत्कार
कु. रोहीणी खानदेव देवबा, रा. पट्टणकोडोली यांनी थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत 33 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल, कु. यश काशिनाथ कामांना, रा. पट्टणकोडोली ता. हातकणंगले यांनी थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत 41 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवल्याबद्दल व कु. प्रथमेश सूर्यकांत पाटील, रा. बानगे ता. कागल यांनी थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत 44 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवल्याबद्दल गोकुळ दूध संघाच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या... कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील (आबाजी ) हें होते.
गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलं यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक रणजित पाटील, अमरीश घाटगे, सेनापती संताजी घोरपडे कारखाना चेअरमन नावेद मुश्रीफ, चेतन नरके, महिला संचलिका जि. प कोल्हापूर माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, अंजना रेडेकर आदीसह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या