नाईट कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेच्या अनावरण

यड्राव (प्रतिनिधी ) : येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील मराठी विभाग व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, संस्थापक अध्यक्षा स्वर्गीय सरोजिनीताई खंजिरे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर दिनाचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने भित्तिपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा इचलकरंजी चे कार्याध्यक्ष श्री राजन मुठाणे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंदर नारे उपस्थित होते.
          यावेळी बोलताना श्री राजन मुठाणे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील योगदान स्पष्ट करताना अण्णा भाऊ यांनी गरीब, दलित व वंचित समाजाच्या जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यातून केले. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख आणि अवहेलना अण्णाभाऊ साठे यांनी कणखर व्यक्तीरेखांच्या माध्यमातून मराठी साहित्यात अजरामर केले असे प्रतिपादन केले. तसेच अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदानाची माहिती दिली. 
     कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी संस्थापक अध्यक्षा स्वर्गीय सरोजिनीताई खंजिरे यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळकांच्या कर्तुत्वाचा वेध घेतला. 
         भित्तिपत्रिकेत अण्णाभाऊ साठे यांचे समग्र लेखन, साहित्यकृतीची मुखपृष्ठे तसेच स्वर्गीय सरोजिनीताई खंजिरे व लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तुत्वाच्या परिचय करून दिला.  सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. एफ. एन. पटेल यांनी तर स्वागत भित्तिपत्रिका विभाग प्रमुख डॉ. प्रवीण पोवार यांनी केले.  सदर कार्यक्रमाचे   सूत्रसंचालन डॉ. जीवन पाटील यांनी केले , तर प्रा . सौरभ पाटणकर यांनी आभार मानले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.