एसटी नांदेड आगारात भारतीय अवयवदान दिन साजरा; कामगार - कर्मचाऱ्यांनी घेतली अवयवदानाची शपथ

नांदेड- केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता भारतीय अवयवदान दिन (इंडियन ऑर्गन डोनेशन डे) साजरा करुन कामगार कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या शपथ घेऊन अवयवदान दिनानिमित्त जनजागृती केली. यावेळी एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन अवयवदानाबद्दल आपले मनोगत विषद केले. ते आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले की, एका अवयवदात्यामुळे ८ ते ९ जिव वाचवू शकतो म्हणून समाजातील अवयवदानाबद्दलच्या समज गैरसमज मानसिकतेबद्दल एक लोकचळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, आपल्या भारत देशामध्ये १९९४ मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपणाची क्रिया झाली असून त्या अवयवदात्याच्या स्मरणार्थ ३ ऑगस्ट हा दिवस भारतीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी गुणवंत एच. मिसलवाड यांनी रा.प.म. आगारातील कामगार- कर्मचाऱ्यांना अवयवदानाची सामूहिकरित्या शपथ दिली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, आगार लेखाकार सतीश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहर माळगे, हेड कॅशिअर सुमीत महाजन, लिपीक सुरेश फुलारी, गुलाम रब्बानी, संतोष देवकांबळे, कृष्णा पवार, सौ. सुनीता हुंबे, मनिषा कदम, योगीता सुवर्णकार, रेखा माचीनवार, वैशाली कोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास आगारातील कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.