महिला आश्रम मध्ये महिलांशी हितगुज व विविध कला गुणदर्शन दाखवणारे कार्यक्रम
गोव्यातील अंजूना, बार्डेज, येथील महिला आश्रम मध्ये महिलांशी हितगुज, अभिवाचन व विविध कला गुणदर्शन दाखवणारे कार्यक्रम
दिनांक: शनिवार, ऑगस्ट २४, २०२४
*अर्लियन कवियों का अध्यात्म प्राइवेट लिमिटेड
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष*
या नात्याने मी सौ.रोहिणी अमोल पराडकर,
साईबाबा मंदिर महिला आश्रम आणि बालिकाश्रम येथे सर्वांचे स्वागत करून तीन उपक्रम घेतले. साईबाबा मंदिर येथे कवी कट्टा व भोजनाची व्यवस्था सौ. कविता शेट्ये व त्याचे पती चंद्रशेखर शेट्ये यांनी केली. तसेच आम्हाला देवळाचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने देवस्थान कमिटीचे मनःपूर्वक आभार मानते.
उपस्थित कवींच्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमा नंतर सर्व कवींना *सन्मानपत्र* देऊन त्यांचा सत्कार केला. ह्या अशा आखीव रेखीव आणि भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आरती दिनकर ताईंनी केले. नंतर
बालिकाश्रम मध्ये गेल्यावर सर्व मुलींनी त्यांची ओळख करून दिली व सुरेल आवाजात गणपती स्तोत्र म्हंटले. नंतर सर्वांना सौ. प्रांजली चौधरी ताईंनी सर्व वयोगटातील मुलींना रांगोळी काढायला शिकवले. रांगोळी काढतांना सर्व मुली खुपचं उत्साही आणि आनंदी झाल्या होत्या. त्यांचा आनंद त्यांच्या निसागास चेहेऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता. रांगोळी काढण्यात
सर्व मुली इतक्या गुंग झाल्या होत्या की वेळ कसा चुटकी सारखा निघून गेला कळलेच नाही. नंतर सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन झाले.
महिला आश्रम मध्ये महिलांशी हितगुज व अभिवाचन आणि विविध कला गुण दर्शन दाखवणारे कार्यक्रम केले. एकपात्री प्रयोग दीपक सरांनी करून कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवले
नंतर राधा पोकळे ताईंनी संस्थेची माहिती देणारी पुस्तक भेट दिली. अश्या अप्रतिम कार्यक्रमाचा शेवट महिला श्रमातील महिलांनी प्रेमाने बनवलेल्या स्वादिष्ट चहा पोहे खाऊन झाला. हिरवाईने नटलेल्या, अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणातून कुणाचेच पाय निघत नव्हते. परंतु परत लवकरच पूर्नभेटीचे आश्वासन देऊन सगळ्यांचा
प्रेमभरा निरोप घेतला.
आजचा या खास दिवसा वर कवी श्री दीपक पवार सरांनी सुंदर काव्य रचना केली.
*रंगले कवी गोमंतकात*
गोमंतकाची माती असे आगळी,
रेखाताईची तयारी निराळी.
रोहिणीताईंचे नियोजन खुप भारी,
कविताईंचे भोजनाची चव लई न्यारी.
डाॅ.आरती सांभाळती निवेदनाचा भार
सौ. प्रांजली नी दिला मंचाला आवाजाचा आधार.
वर्षांच्या अन् नागरत्नांच्या बरसल्या शब्दधारा,
रेखाजीं व सर्वांच्या संगतीला पाऊस अन् वारा.
ॠचाजींच्या शब्दात जादूई स्वर,
सुनिता जी व मंजिरीजीं चा अमृतमय सूर.
शैलजाजींच्या स्वरात व नृत्यात सुंदर ताल - लय,
या पामराचे आनंदाने भरून आले हृदय.
*कवी दिपक पवार*.
रुकडी, कोल्हापूर
टिप्पण्या