हुपरीतील नागरिकांची आरोग्य धोक्यात आरोग्यसेवेची विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तर आरोग्य अधिकारी,तालुका अधिकारी व मुख्याधिकारी यांनी जबाबदारी झटकली.

हुपरी शहरांमधील केंद्रीय आरोग्य केंद्र प्रमुख जाधव मॅडम यांच्याशी आज हुपरीतील बोगस डॉक्टरांच्या बाबत चर्चा केली असता त्यांच्याकडे मिळाले माहिती अशी की त्यांनी सर्वे करून रिपोर्ट तालुका आरोग्य विभागाकडे तसेच जिल्हा चिकित्सालय यांच्याकडे पाठवले आहेत अशी माहीती सांगितले 
त्यांनी पाठवलेल्या रिपोर्ट पाहता त्यामध्ये काही चुकीच्या त्रुटी आढळून आल्या 
त्यावर त्यांनी हा रिपोर्ट मागील असल्यास सांगितले 
त्यांना सर्वे बाबतची माहिती विचारली असता दरवर्षी सर्वे करणे बंधनकारक असुन त्यानी मागील तसे पुढे डाटा भरुन विना चौकशी अतिमं अहवाल दिला असुन यामधे गावाच्या आरोग्य विषयी इतका निष्काळजी पणा का हा विषय गंभीर पणाने घेणे गरजेचे होते
शहरातील डॉक्टरांचे सर्वे बरेच वर्षे झाले नसल्याचे निदर्शनास आले. 
बोगस डॉक्टरांच्या कारवाईबाबत विचारणा केली असत. 
कारवाई करण्याचा अधिकार नगरपरिषदकडे असल्याचे त्यांनी सांगितले 
याबाबत नगर परिषदेमध्ये विचारणा केली असता अशी माहिती समोर आली की सदरनगर परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने बोगस डॉक्टरच्या कारवाई करणेचा अधिकार आम्हास प्राप्त होत नाही. 
परंतु जिल्हा चिकित्सालय यांनी नगर परिषदेस बोगस डॉक्टरांच्या वर कारवाई व लॅब चालक त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
परंतु नगर परिषदे मध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे ते कारवाई करत नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्र यांना अधिकार नसल्यामुळे ते कारवाई करू शकत नाही तर शहरातील नागरिकांच्या आरोग्य  विषय विचार करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला 
हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र व हुपरी नगरपरिषद हे दोन्ही कार्यालय मिळून हुपरीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे 
त्यामुळे हुपरी शहरातील नागरिकांची आरोग्य सेवा ही रामभरोसे असुन यावर मुख्याधिकारी यांना विचारले असता त्यांनी कारवाईचा अधिकार आरोग्य अधिकारी यांच्या समितीस असुन मला अधिकार नाहीत असे स्पष्ट केले असल्याने कोणीही हुपरीची आरोग्य खात्याची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे आढळून आले आहे 
जर हुपरीकराचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर 
यामधे सर्वोत्परी आरोग्य अधिकारी ते तालुका अधिकारी,मुख्याधिकारी यांना दोषी धरण्यात यावे असे गावकऱ्यांची भावना आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.