मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये छायाचित्र दिन, रक्षाबंधन सोहळा उत्साहात

शिरोळ : प्रतिनिधी : विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात "कै. बाबासाहेब पाटील यांचा स्मृतिदिवस तथा जागतिक छायाचित्रदिन उत्सहात संपन्न झाला .
 मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै. बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .स्वागत व प्रास्ताविक सौ. जयश्री पाटील  यांनी व्यक्त केले .
फोटोग्राफर  शुभम बावचे विनायक चुडमुंगे  श्रीमती सुशिला पाटील , सौ.आशाताई पाटील , मनोज पाटील , महेश पाटील , सौ. अपेक्षा पाटील यांचा संस्थेचे सचिव मेजर के. एम् भोसले  यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला .
फोटोग्राफर शुभम बावचे यांनी आपल्या मनोगतातू आपल्या स्वतःहच्या परिस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांना करून आपल्या कार्याची देखील थोडक्यात माहिती दिली.
सौ. आशाताई पाटील यांनी कै. बाबासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती दिली .संस्थेचे सचिव प्रा. मेजर के. एम् भोसले  यांनी आपल्या मनोगतातून कै.बाबासाहेब पाटील यांनी संस्थेच रोपटं लावण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे . ते एक आधारवड होते. त्याचबरोबर छायाचित्रामध्ये एक कल्पकता असते असे प्रतिपादन केले .
यावेळी विद्यालयात " रक्षाबंधनाचा "कार्यक्रम घेण्यात आला . आभारप्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक  नितिन बागुल यांनी व्यक्त केले .
सुत्रसंचालन पृथ्वीचंद माछरेकर सर व विद्यार्थीनी कु. वैष्णवी सावंत यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.