गंगाखेड येथील "चौधरी पेट्रोलियम" वरगुंडांचा हैदोस.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

परभणी : गंगाखेड येथील चौधरी पेट्रोलियम वर काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पेट्रोल भरून पैसे न देता हुज्जत करून पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना जीवघेणी मारहाण करून जखमी केले आहे. त्याच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करण्यासाठीचे निवेदन फामफेडा (Fedreration of All Maharashtra Petrol Dealer's Association) च्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना देण्यात आले. याप्रसंगी फामफेडा परभणी जिल्हाध्यक्ष अमोल भेडसुरकर, सचिव मिलिंद सावंत,आनंद भरोसे,विनय बाठीया सुनील देशमुख, आकाश लहाने, उमेश शहाणे, हनुमान शिंदे, प्रभाकर मुरकुटे,विजय शर्मा, बसवराज शिवणकर, उमाकांत कोल्हे, सुनील चौध री,दशरथ चौधरी, सुधीर देशमुख,शरण चौधरी,विजय देशमुख, अनुप कान्हेकर यांच्या सह अनेक पेट्रोल पंप मालक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.