माणकापूरात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय , शाखा माणकापूर
येथे आज रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास हुपरी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र संचालिका राजयोगीनी बी.के. सुनिता दिदी, राजयोगी बी.के. वसंत भाई, बी.के. गीता बहेनजी उपस्थित होत्या.
राजयोगीनी बी.के. सुनिता दिदी यांनी मनोगत व्यक्त करताना, आपण रक्षाबंधन हा सण फक्त परंपरा म्हणून साजरा करतो. पण राखीचा वास्तविक अध्यात्मिक अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. रक्षासुत्र म्हणजे फक्त धागा नसून सात्विकतेचं आणि पवित्रतेचं प्रतिक आहे. मनातील विचार सात्विक, शुद्ध असतील तर मुखातून निघणारी वाणी देखील सात्विक आणि आनंददायी बनते. विचार आणि वाणी सात्विक बनवले तर कर्म ही शुद्ध सात्विक बनत जातात. परिणामी सात्विक, पवित्र, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडते. मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धी म्हणजेच रक्षाबंधन असा रक्षाबंधनाचा अध्यात्मिक अर्थ आहे. अशा चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्वाच्याद्वारेच सुसंस्कृत आणि एकी असलेला समाज घडत असतो. आणि असा सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे, ईश्वरीय ज्ञान आणि सहज राजयोगाच्या आधारे स्व परिवर्तन से विश्व परिवर्तन या तत्त्वावर गेली ८८ वर्षे विश्व नवनिर्माणाचे कार्य नारीशक्तीच्या पुढाकारने निराकार परमपिता परमात्मा शिव करवत आहेत . असे उद्गार राजयोगीनी सुनिता दिदी याप्रसंगी व्यक्त केले. सरपंच सुनील म्हाकाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी बी.के. वसंत भाई यांनी विद्यालयाचा परिचय करवून देत असताना विद्यालयाच्या कार्याचा विस्तार १५० पेक्षा जास्त देशात पसरला असून भारतातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषी अशा अनेक क्षेत्रांत होत असलेल्या विद्यालयाच्या कार्याची माहिती दिली. तसेच १५ लाखांपेक्षा जास्त लोक या ज्ञानाचा आणि राजयोगाचा लाभ दैनंदिन जीवनात घेत असल्याचे सांगितले.
बी.के. गीता बहेनजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी
ग्रा.पं. सदस्य अनिल आरगे,
ग्रा.पं.सदस्या जयश्रीताई पुजारी,
ग्रा.पं. सदस्या वैशाली कुंभार,
ग्रा.पं.सदस्या कविता लोंढे, गावातील अंगणवाडी शिक्षिका, पाठशाळेचे नियमित सदस्य तसेच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शेवटी ग्रा.पं.सदस्य बी.के. राजू कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले.
टिप्पण्या