पट्टण कोडोली मध्ये प्रथमच मसुरकर फाऊंडेशन तर्फे101111/- रुपये ची दहीहंडी.
स्व. पुष्पादेवी हरिभाऊ मसुरकर सोशल फाऊंडेशन तर्फे पट्टण कोडोली मध्ये श्री.कृष्ण जन्माष्टमी चे निमीत्त साधुन प्रथमच 101111/- रुपये च्या दही हंडीचे नियोजन दिनांक 30/08/24 रोजी संध्याकाळी 7 वाजता करण्यात आले आहे. हि दही हंडी पट्टण कोडोली च्या श्री.विठ्ठल बिरदेव मंदिर शेजारी यात्रा स्थळी घेण्यात येणार आहे ह्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे
मसुरकर फाउंडेशन तर्फे पट्टण कोडोली गावामध्ये अनेक सामाजिक कार्य केले आहे तसेच गरजु व गरीब लोकांना नेहमी मदत करण्याचे काम केले आहे सदर दही हंडी हि ग्रामीण भागातील सर्वात मोठी दही हंडी असणार आहे ह्या साठी विशेष करून मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे व शर्वणी पिल्लई हे प्रमुख आकर्षण असणार आहेत फाऊंडेशन कडून कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आलेले आहे . या दहीहंडी साठी विविध भागातून स्पर्धक सहभागी होणार आहेत . या कार्यक्रमासाठी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती प्रामुख्याने खा.धैर्यशील दादा माने,आ.राजू बाबा आवळे यांचे सह इतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
टिप्पण्या