भरधाव स्कूल बस ची रेल्वे गेटला धडक

कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे        
विठ्ठलवाडी येथील आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली येथे सकाळी सात वाजता भरधाव स्कूल बसने रेल्वेची गेट लागत असताना या रेल्वे गेटला जोराची धडक दिली.स्कूल बस थेट रेल्वे रुळावर जाऊन अडकली .दरम्यान या ठिकाणाहून जाणारी डेमो रेल्वे काही अंतरावर येऊन थांबली होती.रुळावर अडकलेली बस तेथील स्थानिक लोकांनी ढकलून बाजूला केली ज्यामुळे रेल्वे रूळ मार्ग मोकळा झाला. विठ्ठलवाडी आमनापूर मार्गावरील वाहतूक या वेळी काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने या बस मध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणीही विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.