कारखान्यातील मशिन चोरी करणारे दोघांना अटक , चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. शहापूर पोलीस गुन्हे शोध पथकाची कारवाई
यड्राव (ता . शिरोळ ) येथील पार्वती इंड. इस्टेट येथे असलेल्या कारखान्यात कारखान्याच्या स्टोरुमच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल उचकटून स्टोरुममधील मशिनसह मोटर सायकल असे जवळ जवळ चार लाख रुपयांचा माल चोरीस गेला होता . सदर घटना दि . 16 व १७ आॕगष्ट रोजी घडली होती . तशी फिर्याद गफार अकबरअली गोटे (रा . कृष्णानगर गल्ली नं . 1 शहापूर ) यांनी शहापूर पोलीस ठाणेत दिली होती . त्यावरून आज गुरुवार दि . 29 आॕगष्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच सादीक मदरसाब तळेवाड वय 21 वर्षे (रा . आडवी गल्ली कारंडेमळा शहापूर ) व साहिल झाकिरहुसेन दुरुग वय 20 वर्षे (रा . गल्ली नं . 3 कृष्णानगर इचलकरंजी )या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हाची कबूली दिली . व त्याच्यांकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . सदर कारवाई शहापूर पोलीस गुन्हे शोध पथकाने केली . त्यांना न्यायालयात हजर केले असता दि . 30 आॕगष्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली दिली आहे . सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित , अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे , उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सचिन सुर्यवंशी , श्रीकृष्ण दरेकर , अविनाश मुंगसे , आशिफ कलयगार , रोहित डावाळे , अर्जुन फातले , रविद्रं महाजन , शशिकांत ढोणे आदिंनी केली .सदर गुन्ह्याचा तपास श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत.
टिप्पण्या