पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निपाणीच्या सर्वांगीण विकासाची आपण कटिबद्ध . निपाणी आमदार शशिकला जोल्ले.

इमेज
बोरगांव/ प्रतिनीधी                         अखंड बेळगांव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगर पालिकेत विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या चाणाक्ष बुद्धिमत्ता मुळे पुन्हा एकदा निपाणी नगर पालिकेत भाजप चे नगराध्यक्ष, व उपनगराध्यक्ष निवडूण आले आहेत.निपाणी च्या इतिहासात  नगरपालिकेवर सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आणण्यात आपल्याला मोठ  यश आलेलं असून भाजप पक्षाच्या नगरसेविका सोनल कोठाडिया या निपाणीच्या नूतन नगराध्यक्ष्या  व उपनगराध्यक्ष म्हणून संतोष सांगावकर  यांची निवड झालेली असून  येणाऱ्या काळात निपाणी येथील 31 वार्डामध्ये  राज्यात  कोणतेही सरकार  असू दे निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी  आपण कटिबद्ध आहोत, विकास कामाला कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू देणार नाही असे मत माजी मंत्री आणि विद्यमान आमदार   सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.  त्या निपाणी येथील  नगरपालिका कार्यालयांमध्ये  नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठ...

जलालपूर गावातील डी.जे.हेरवडे शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना आमदार डी.एम.इहोळे यांच्या हस्ते बूट व मोजे वाटप

इमेज
रायबाग : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या अध्यापनासह अभ्यासक्रमेतर उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे मत आमदार डी.एम.इहोळे यांनी व्यक्त केले.  तालुक्यातील जलालपूर गावातील डी.जे.हेरवडे शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना चपला व मोजे वाटप करून विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले.  मुख्याध्यापक व्ही.बी.बनशंकरी, ग्रा.पं.उपाध्यक्ष मौलाना नदाफ, सदाशिव घोरपडे, मल्लू जगदाळे, राजू जाधव, नामदेव कांबळे, बसवराजवण्णा, पांडुरंग हवालदार, बसगौडा पाटील, बाबुराव अंबरगे, नानासाब सोनार, विनायक पवार, रोहीतराम पं.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

सविता शिंदे यांचा नुकताच सर्पदंशाने मृत्यू,त्यामुळे त्यांचे वारस, त्यांचे पती तुकाराम शिंदे यांना निधीतून ३० हजार रुपयेचा धनादेशाचे वाटप

इमेज
रायबाग : तालुक्यातील जलालपूर गावातील ज्योती विवेकशाळा सहकारी संघ शाखेत ज्योती सूक्ष्म कर्ज घेतलेल्या सहकारी सदस्या सविता तुकाराम शिंदे यांचा नुकताच सर्पदंशाने मृत्यू झाला, त्यामुळे त्यांचे वारस, त्यांचे पती तुकाराम शिंदे यांना सहकारी सदस्य कल्याण निधीतून ३० हजार रुपये मिळाले.  धनादेशाचे वाटप करण्यात आले.  सल्लागार समितीचे सदस्य बसगौडा पाटील, रावसाहेब हेरवडे, तिप्पाण्णा पाटील, निंगाप्पा पुजारी, शाखा व्यवस्थापक सुधीर तारवाळे व कर्मचारी उपस्थित होते.

'महावीर' मधील मराठी वाड्मय मंडळ वाचन संस्कृती जोपासते.! - कृष्णात खोत

इमेज
महावीरमध्ये मराठी वाड्मय मंडळाचे उद्घाटन         महावीर महाविद्यालयातील मराठी वाड्मय मंडळाच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण होऊन ते २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या वाड्मय मंडळाने अनेक लेखकांच्या कलाकृती संग्रहित केल्या असून त्या विद्यार्थ्यांकडून वाचून घेतल्या आहेत. आजच्या विविध माध्यमांच्या भाऊगर्दीत महावीर मधील मराठी वाड्मय मंडळाने वाचन संस्कृती जोपासण्याचे मोठे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्य केले आहे. आणि ते पुढे करीत राहतील असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'रिंगाण'कार कृष्णात खोत यांनी काढले. ते महावीर महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.             कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .पी. लोखंडे तर बी.ए .बी.एड. चे समन्वयक डॉ. महादेव शिंदे , प्रा. जयवंत दळवी , प्रा.डॉ.गोमटेश्र्वर पाटील व डॉ.शरद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.              खोत ,पुढे म्हणाले, 'सूचने' हा लेखकाचा सण असतो. ले...

सार्थक ठरला एकूण 214 वजन उचलून रौप्यपदकाचा मानकरी

इमेज
अकिवाट प्रतिनिधी - सचिन मठपती  संभाजीनगर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय युथ स्पर्धेमध्ये विश्वविजय वेटलिफ्टिंग जिमचा खेळाडू * कु.सार्थक शितल हळींगळे * याने 73 किलो वजनी गटात 96 किलो स्नॅच आणि 118 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 214 वजन उचलून रौप्यपदकाचा  मानकरी ठरला सार्थक तुझे खूप खूप मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन

प्रिन्स सीबीएसई स्कूल येथे "कॅप सिरेमणी व उत्कृष्ट शिक्षण डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार सोहळा सपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : दि. 31 शनिवार रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल येथे प्रेसिडेन्शिअल परीक्षेत पहिले येणाऱ्या विद्या र्थ्यांना ऑरेंज कॅप  व  छ.संभाजीनगर येथे पंच तारांकित हॉटेल मध्ये जेवण  व दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यां ना यल्लो कॅप देण्यात आल्या. कार्यक्रमाचे  अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्या सौ. प्रगती शिरसागर, गुण वंत विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.डॉ. संजय रोडगे यांचा कार्यभार शाळे पुरतेच मर्यादित न राहता पूर्ण जिल्ह्या मध्ये उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण असल्यामुळे त्यांना उत्कृष्ट "शिक्षण तज्ञ" हा पुरस्कार भेटला. याबद्दल उपस्थित पालक वर्ग व शिक्षकवृंद यांनी डॉ. संजय रोडगे यांचा सत्कार  करण्यात आला.डॉ.प्रताप सिंग शिंदे, डॉ. नाईकनवरे, प्रा. राजाराम झोडगे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन  केले. उपस्थित पालकां नी मनोगत व्यक्त करतां ना अश्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून गुणवंत विद्यार्थी घडत...

यळगुड येथील पंक्चर दुकानदाराचा अज्ञातांकडून खून

इमेज
हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथील जवाहर साखर कारखाना पेट्रोल- पंपाजवळ असणाऱ्या टायर पंक्चर दुकानदाराचा अज्ञातांनी गुरुवारी रात्री निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. गिरीष पिल्लाई (वय ५०, मुळ केरळ, सध्या रा.विशालनगर, हुपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या दुकानातच हा खून झाला आहे.  या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांच्यासह हुपरीचे पोलीस अधिकारी हे घटनास्थळांवरील माहिती घेऊन तपास करीत आहेत. गिरीष पिल्लाई यांचे पेट्रोलपंपासमोरच टायर पंक्चरचे गेल्या २५ वर्षांपासून दुकान आहे. त्यांची पत्नी हुपरीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्यांनी पत्नी व मुलांना आपल्या मूळ गावी केरळ मध्ये पाठविले होते.  रात्री दुकान बंद करून ते तेथेच झोपले होते. त्यांच्या पत्नीने रात्री त्यांना फोन केला होता. मात्र, त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांनी पतीच्या मित्राला फोन करून माहिती दिली. त्यानंतर मित्राने गिरिष यांच्या दुकानात जाउन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल...

गंगाखेड येथील "चौधरी पेट्रोलियम" वरगुंडांचा हैदोस.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  परभणी : गंगाखेड येथील चौधरी पेट्रोलियम वर काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पेट्रोल भरून पैसे न देता हुज्जत करून पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना जीवघेणी मारहाण करून जखमी केले आहे. त्याच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करण्यासाठीचे निवेदन फामफेडा (Fedreration of All Maharashtra Petrol Dealer's Association) च्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना देण्यात आले. याप्रसंगी फामफेडा परभणी जिल्हाध्यक्ष अमोल भेडसुरकर, सचिव मिलिंद सावंत,आनंद भरोसे,विनय बाठीया सुनील देशमुख, आकाश लहाने, उमेश शहाणे, हनुमान शिंदे, प्रभाकर मुरकुटे,विजय शर्मा, बसवराज शिवणकर, उमाकांत कोल्हे, सुनील चौध री,दशरथ चौधरी, सुधीर देशमुख,शरण चौधरी,विजय देशमुख, अनुप कान्हेकर यांच्या सह अनेक पेट्रोल पंप मालक उपस्थित होते.

स्टेट बँक ऑफ इंडिया सेलू मध्ये ग्राहकाचे दीड लाख रुपये लंपास.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. दोन अज्ञात महिलां विरोधात गुन्हा.  सेलू : सेलू येथील जवाहर रोड वरील भारतीय स्टेट बँकेत गुरुवारी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास पिक कर्ज भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाची दोन अनोळखी महिलांनी दीड लाखाची रक्कम चोरी करून पलायन केले. पाथरी शहरातील आदर्श नगर मधील चंद्रकांत पिंपळगावकर यांनी महाराष्ट्र बँक पाथरी येथून 2 लाख रुपये उचलले त्यापैकी 40 हजार रुपये त्यांनी आपल्या वाहनाच्या डिक्कीत ठेवून एक लाख साठ हजार रुपये सेलूच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत पिक कर्ज भरण्यासाठी बँकेत आले.बँकेत स्लीप भरताना त्यांच्या बाजूस दोन अनोळखी महिला आल्या.एकीने तोंडाला रुमाल बांधलेला होता तर एकीच्या डोक्यावर साडीचा पदर होता. पिंपळगावकर हे काउंटरवर भरलेली स्लीप देऊन हातातील पिशवीतले पैसे जमा करण्यासाठी शोधत असता त्यांना त्यात पैसे आढळून आले नाही तर पिशवी फाटलेली दिसली.त्यात फक्त दहा हजार रुपये होते.उर्वरित दीड लाख रुपये त्या दोन अज्ञात महिलांनी चोरून नेले असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चंद्रकांत पिंपळगावकर यांच्या फिर्यादीवरून पो.नि. दीपक बोरसे या...

कारखान्यातील मशिन चोरी करणारे दोघांना अटक , चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. शहापूर पोलीस गुन्हे शोध पथकाची कारवाई

इमेज
यड्राव (ता . शिरोळ ) येथील  पार्वती इंड. इस्टेट येथे असलेल्या कारखान्यात कारखान्याच्या स्टोरुमच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल उचकटून स्टोरुममधील मशिनसह मोटर सायकल असे जवळ जवळ चार लाख रुपयांचा माल चोरीस गेला होता . सदर घटना दि . 16 व १७   आॕगष्ट रोजी घडली होती . तशी फिर्याद गफार अकबरअली गोटे (रा . कृष्णानगर गल्ली नं . 1 शहापूर ) यांनी शहापूर पोलीस ठाणेत दिली होती . त्यावरून आज गुरुवार दि . 29 आॕगष्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच सादीक मदरसाब तळेवाड वय 21 वर्षे (रा . आडवी गल्ली कारंडेमळा शहापूर ) व साहिल झाकिरहुसेन दुरुग वय 20 वर्षे (रा . गल्ली नं . 3 कृष्णानगर इचलकरंजी )या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हाची कबूली दिली . व त्याच्यांकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . सदर कारवाई शहापूर पोलीस गुन्हे शोध पथकाने केली .                 त्यांना न्यायालयात हजर केले असता दि . 30 आॕगष्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली दिली आहे . सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित , अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे , उपविभाग...

महिलांनी शस्त्र व शास्त्र दोन्ही घेवून नव्य बदलांचा स्विकार करावा.- कल्पना रायजाधव यांचे प्रतिपादन मलिकवाड येथे सरस्वती महिला व राणी चन्नम्मा संस्थेची वार्षिक सभा

इमेज
मलिकवाड - प्रतिनिधी (अमर माने) ज्या त्या भागातील लोकांच्या विकासावरूनच त्या भागातील संस्थांची सुदृढता पाहायला मिळते. व्यवहार करताना मानवताही जपणे आवश्यक आहे. महिलांनी शास्त्र व शस्त्र दोन्ही हातात घेऊन नव्या बदलाचा स्वीकार करीत सर्वच दृष्टीने स्वावलंबी होण्यासाठी वाटचाल करावी असे आवाहन कारदगा येथील शिक्षिका कल्पना रायजाधव यांनी केले. मलिकवाड येथील श्री सरस्वती महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी व वीर राणी चन्नम्मा महिला दूध सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने वार्षिक सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना रायजाधव यांनी अलीकडच्या काळात माणसाने आर्थिक उंची गाठण्यासोबत मानवतेचा दिवा मनामनात लावणे आवश्यक बनले आहे. पैसा मुबलक होत आहे तर मानवता घटत आहे. समाजातील दुष्ट विचार अद्याप दूर झालेले नाहीत. परिणामी महिलांनी मनात धाडस, दृष्ट नजरा कमी करण्या...

राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जनसेवा नागरी पतसंस्थेच्या वतीने क्रीडा शिक्षकांचा गौरव.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : दि.29 ऑगस्ट रोजी सेलू येथील जनसेवा नागरी पत संस्थेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गुरूवार ता. २९ ऑगस्ट रोजी हॉकी चे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त तालू क्यातील सर्व क्रीडा शिक्षकांचा गौरव कर ण्यात आला.या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीरराव  चौधरी, सचिव गणपतराव लहुरीकर, उपाध्यक्ष प्रा.गौतम सुर्यवंशी, संचालक प्रा.नागेश कान्हेकर, मोहन खापरखुंटीकर,नरेंद्र धानोरकर,शाखाधिकारी श्रीपाद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. जेष्ठ क्रीडा शिक्षक देविदास सोन्नेकर, सतीश नावाडे, प्रदीप कौसडीकर,प्रा.डॉ.के.के.कदम, मुख्याध्याप क सर्जेराव लहाने, सौ संगीता खराबे,गणेश माळवे, किशोर ढोके, सुभाष मोहकरे, अनिल कौसडीकर,रामेश्वर कद म,शेषराव नागरे,राजेश राठोड, सुरज शिंदे, प्रा.सौ.सुश्मीता भरदम यांचा मान्यवरांच्या हस्ते व्हीसल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्य क्रमाचे प्रास्ताविक प्रा नागेश कान्हेकर, सूत्रसं चालन सुभाष मोहकरे तर, गणेश माळवे यांनी आभार मानले. कार्य क्रम यशस्वीते साठी पतसंस्थेचे कर्मचारी गंगाधर वाघमारे...

नाईट कॉलेजचे अधीक्षक सिंकदर पटेल यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार .

इमेज
यड्राव  ( प्रतिनिधी ) :  पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे आयोजित समारंभात नाईट कॉलेजचे अधिक्षक सिकंदर नजरुद्दीन पटेल यांना आदर्श शिक्षकेतर  कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.. कार्यालयीन कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात आले. यानिमित्ताने महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.         सत्कार समारंभ प्रसंगी कार्याची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी सिकंदर पटेल यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे अशी भावना व्यक्त केली. तसेच त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.        यासाठी संस्थेचे चेअरमन अरुणराव खंजिरे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुरदंडे, सचिव शेखर पाटील, युवा नेते राहुलजी खंजिरे तसेच सर्व संचालक यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले.             सत्कार प्रसंगी डॉ. विरुपाक्ष खानाज, डॉ. बी. यु. तुपे, डॉ. रविकिरण कोरे...

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्यजिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

इमेज
कोल्हापूर, दि. 27 :   प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत जिल्ह्यातील १ हजार ८८२ वीज ग्राहकांच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे तर ४ हजार १० वीज ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. वापराएवढी वीजनिर्मिती होत असल्याने त्यांचे वीज देयक शून्यापर्यंत कमी झाले आहे. या पर्यावरणपूरक योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनीही आवर्जून या योजनेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.   जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली योजनेच्या समितीची बैठक नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., ‘महावितरण’चे अधिक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मासाळ व जिल्हा अग्रणी बँकांचे गणेश गोडसे उपस्थित होते.   जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारी ही योजना आहे. जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच योजने अंतर्गत जिल्ह्...

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार कल्याण निधी व मंडळाच्या योजना व उपक्रमांबाबत भव्य चर्चासत्राचे आयोजन

इमेज
कोल्हापूर :           महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय, कोल्हापूरच्या वतीने राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता, कामगार कल्याण अधिनियम १९५३ च्या अनुसंगाने, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना व उपक्रम यांचा जास्तीत जास्त लाभ विविध आस्थापनातील कामगार व कामगार कुटुंबीयांना मिळावेत, याकरीता मंडळाच्या प्रवाहापासून वंचित व उपेक्षित राहिलेल्या कामगार / कर्मचारी यांना, मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहात सामावून घेण्यासाठी, उद्योजक, व्यावसायिक व आस्थापना प्रतिनिधी यांचे भव्य चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.           कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मोठे सर्व कारखाने व कंपनी, विज कंपनी, एस. टी. महामंडळ, सर्व बँका, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, जीवन प्राधिकरण, एल. आय. सी., कापुस पणन महासंघ, साखर कारखाने, के. एम. टी., शेतकरी संघ, कृषी उद्योग महामंडळ, दूध संघ, सुतगिरणी, सिनेमागृहे, मॉल्स, शासकिय व खाजगी प्रेस, सर्व वृत्तपत्रे, बी. एस. एन. एल., गाड्यांचे शोरुम्स, ट...

माननीय श्री महेश गोविंद जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

इमेज
इचलकरंजी - टाकवडे येथील श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवा संस्था ट्रस्ट यांच्यावतीने दिनांक 25 8 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री दत्त संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व मासिका ,  दैनिकांमध्ये व साप्ताहिक मध्ये जाहिरात देण्यात आली होती .की समाजातील लोकांचे आपण काही देणे लागतो  आपण समाजासाठी काय केले आहे .समाजाच्या हिताच्या साठी सर्वच क्षेत्रांमध्ये नावलौकिक केले असलेले लोकांनी प्रस्ताव पाठवावा. अशी जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून महेश जोशी यांनी आपला प्रस्ताव पाठवला. ते एल.आय.सी. जीवन विमा चे काम करतात व त्यांनी प्रस्ताव पाठवला. ज्यावेळी प्रस्ताव त्यांचा श्री दत्त दिव्यांग संस्थेच्या कमिटीकडे आला त्यावेळी कमिटीने त्यांना फोन करून त्यांची मुलाखत घेतली .त्यावेळी त्यांनी दिलेल्या मुलाखतीच्या उत्तरांच्या आधारावर निवड समितीने असे ठरवले .की श्री महेश जोशी हे भलेही एल.आय.सी चे काम करतात त्यांच्या या कामामुळे त्यांचे देखील दिनचर्या चालते. व एलआयसी देखील समाजसेवेचे काम करते. व त्यांनी आजपर्यंत एलआय.सी.मार्फत समाजासाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊन...

आरोग्य स्वास्थासाठी मासिक पाळी दरम्यान योग्यप्रकारे स्वच्छता राखा : डॉ अतुल पाटील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीकडून विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : मासिक पाळी ही मुलींच्या तसेच स्त्रियांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असून त्याबाबत मनात भीती न्यूनगंड न बाळगता सामोरे गेले पाहिजे. मासिक पाळी दरम्यान चिडचिडेपणा , थकवा, पोटदुखी , कंबरदुखी, पाय दुखणे, चिंता नैराश्य भावनिक मूड बदलणे अशा समस्या उद्धभवू शकतात त्यासाठी संतुलित आहार पुरेशी विश्रांती हलका व्यायाम योगासने याबरोबर योग्य प्रकारे स्वच्छता राखणेही तितकेच महत्वाचे आहे. असे विचार डॉ अतुल पाटील यांनी व्यक्त केले  येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यावतीने येथील रुक्मिणी पांडुरंग माने (रहिमतपूरकर) कन्या विद्या मंदिर आणि इंग्लिश स्कूल मौजे आगर या शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य डॉ अतुल पाटील यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले डॉ पाटील बोलताना पुढे म्हणाले की मासिक पाळीदरम्यान योग्य ती काळजी न घेतल्यास मुत्रमार्गात जंतू संक्रमण होणे , बुरशीजन्य त्वचाविकार, गर्भाशयाचा कॅन्सर अशा गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. नित्य आहारात लोह, कॅल्शियम तसेच बी जीवनसत्व जा...

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जनतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

इमेज
थेंब देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये उघडकीस आली आहे. सुनील मुलीला घेऊन निर्जन भागात गेला. त्यानंतर तरुणीने अचानक आरडाओरडा केल्याने नागरिकांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेत बेदम मारहाण केली. सुनीलने 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी नगरच्या कंचरवाडी रोडच्या बाजूने जात होती. त्यानंतर मुलीला ड्रॉप देण्याच्या बहाण्याने तो दुचाकीवर बसला. त्यानंतर त्याला निर्जन भागाकडे नेण्याचा प्रयत्न केला. मुलीला धक्का बसला आणि तिने गाडी थांबवायला सांगितली. मात्र तो न थांबल्याने तरुणीने आरडाओरडा केला. तिचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  स्थानिकांना बलात्काराचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच त्यांनी सुनीलला पकडून रायबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीवर रायबाग तालुका रुग्णालयात उपचार करून त्याला ताब्यात घेण्यात आले. रायबाग पोलीस पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन मठपती यांना युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित.

इमेज
श्री दत्त दिव्यांग निराधार सेवा भावी संस्था टाकवडे यांच्या वतीने मा.श्री. सचिन आण्णाप्पा मठपती (स्वामी) अकिवाट ता.शिरोळ यांना संस्थेच्या वतीने प्रमुख उपस्थित मान्यवरांचे हस्ते युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सचिन हे एक इ सेवा केंद्र चालक आहेत अगदी कमी वयात उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची तळमळ जोपसत आपले कार्य गेली दोन तीन वर्षे अविरतपणे करीत आहेत. या सेवेतून युवा तरूणांना एक नवा आदर्श बनले आहेत. यांच्या कार्याची दखल घेऊन श्री दत्त दिव्यांग सेवा भावी संस्थेच्या त्यांना युवा उद्योजक पुरस्कार देऊन इचलकरंजी येथे सन्मानित करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिण्यात आल्या. या पुरस्काराने सचिनचे सर्वत्र अभिनंदन व कार्याचे कौतूक होत आहे.

महिला आश्रम मध्ये महिलांशी हितगुज व विविध कला गुणदर्शन दाखवणारे कार्यक्रम

इमेज
गोव्यातील अंजूना, बार्डेज,  येथील महिला आश्रम मध्ये महिलांशी हितगुज, अभिवाचन व विविध कला गुणदर्शन दाखवणारे कार्यक्रम दिनांक: शनिवार, ऑगस्ट २४, २०२४ *अर्लियन कवियों का अध्यात्म प्राइवेट लिमिटेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष* या नात्याने मी सौ.रोहिणी अमोल पराडकर, साईबाबा मंदिर महिला आश्रम आणि बालिकाश्रम येथे सर्वांचे स्वागत करून तीन उपक्रम घेतले. साईबाबा मंदिर येथे कवी कट्टा व भोजनाची व्यवस्था सौ. कविता शेट्ये व त्याचे पती चंद्रशेखर शेट्ये यांनी केली. तसेच आम्हाला देवळाचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने देवस्थान कमिटीचे मनःपूर्वक आभार मानते. उपस्थित कवींच्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमा नंतर सर्व कवींना * सन्मानपत्र * देऊन त्यांचा सत्कार केला. ह्या अशा आखीव रेखीव आणि भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आरती दिनकर ताईंनी केले. नंतर बालिकाश्रम मध्ये  गेल्यावर सर्व मुलींनी त्यांची ओळख करून दिली व सुरेल आवाजात गणपती स्तोत्र म्हंटले. नंतर सर्वांना सौ. प्रांजली  चौधरी ताईंनी सर्व वयोगटातील मुलींना रांगोळी काढायला शिकवले. रांगोळी काढतांना  सर्व...

पट्टण कोडोली मध्ये प्रथमच मसुरकर फाऊंडेशन तर्फे101111/- रुपये ची दहीहंडी.

इमेज
स्व. पुष्पादेवी  हरिभाऊ मसुरकर सोशल फाऊंडेशन तर्फे पट्टण कोडोली मध्ये श्री.कृष्ण जन्माष्टमी चे निमीत्त साधुन प्रथमच 101111/- रुपये च्या दही हंडीचे नियोजन दिनांक 30/08/24 रोजी संध्याकाळी 7 वाजता  करण्यात आले आहे. हि दही हंडी पट्टण कोडोली च्या श्री.विठ्ठल बिरदेव मंदिर शेजारी यात्रा स्थळी घेण्यात येणार आहे ह्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे        मसुरकर फाउंडेशन तर्फे पट्टण कोडोली गावामध्ये अनेक सामाजिक कार्य केले आहे तसेच गरजु व गरीब लोकांना नेहमी मदत करण्याचे काम केले आहे सदर दही हंडी हि ग्रामीण भागातील सर्वात मोठी दही हंडी असणार आहे ह्या साठी विशेष करून मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे व शर्वणी पिल्लई हे प्रमुख आकर्षण असणार आहेत फाऊंडेशन कडून कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आलेले आहे . या दहीहंडी साठी विविध भागातून स्पर्धक सहभागी होणार आहेत . या कार्यक्रमासाठी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती प्रामुख्याने खा.धैर्यशील दादा माने,आ.राजू बाबा आवळे यांचे सह इतर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित र...

सांगली हादरली...पॅरोलवर बाहेर येताच कुख्यात गुंडाने केले लैगिंक अत्याचार

इमेज
बदलापूरमधल्या भयंकर घटनेनंतर राज्याच्या विविध भागातून महिलांवर, अल्पवयीन मुलींवर जबरी अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. सांगलीतही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या महिन्यात पॅरोलवर बाहेर आलेल्या संजयने 14 वर्षांच्या एका मुलीला 'तू मला आवडतेस' म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली होती. घडल्या प्रकारामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला नव्हता. यानंतर 23 ऑगस्ट रोजी संजयने या मुलीला एका ठिकाणी बोलावले आणि तिथून तिचे अपहरण करून त्याने स्वत:च्या घरी नेले. तिथे त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराबाबत कोणाला सांगितलंस तर ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली होती. हा प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. ही तक्रार मिळताच पुढच्या दीड तासात पोलिसांनी संजयला शोधून काढत अटक केली. या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय याच्याविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात याला आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

भाजपातर्फे परभणीत जोरदार निदर्शने.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  परभणी : दि.24 कलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्याल यातील महिला डॉक्टर वरील अत्याचारासह क्रुर हत्येचा तसेच बदलापुरातील चिमुक लीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षा च्या वतीने शनिवारी परभणीत जोरदार निदर्शने करण्यात आले आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर,माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख,माजी नगराध्य क्ष कमलकिशोर अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते रितेश जैन, देशमुख (पेडगाव), युवा मोर्चाचे अक्षय डहाळे, माजी नगरसेवक मधुक र गव्हाणे, विजय गाय कवाड, प्रदेश कार्यकार णी सदस्य मोहन कुलकर्णी, संजय रिझवानी, प्रभावती अन्नपूर्वे, दिनेश नरवा डकर, शिवाजी शेळके, रोहित जगदाळे, योगेश तरवटे, शिवाजी तरवटे, महेंद्र धबाले, गुलाबराव पंढरकर, उमेश शेळके, ओम मुदीराज,रामदास पवार, एकनाथ चव्हाण दीपक शिंदे, अनंता गिरी, उमाकांत भरोसे, उध्दवराव गायकवाड, मनोज पोरवाल यांच्या सह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.या निदर्शन कर्त्यांनी प्रशासनास निवेदन सादर करीत दोन्ही घटनांचा निषेध केला.आरोपीं विरोधात कठोर कारवाई व्हा...

बदलापूर व कोल्हापुर येथील घटनेच्या निषेधार्थ उबाठा शिवसेना यांचे ठिय्या आंदोलन

इमेज
बदलापूर व शिये येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव साहेब तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे,शिवसेना शहरप्रमुख विनायक विभुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळ्याफिती कपाळाला बांधून निषेध नोंदवण्यात आला. बदलापूर व शिये ( कोल्हापुर ) घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व  आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.            यावेळी माजी शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ नलवडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख उषाताई चौगुले, रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी,शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते ,विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक सुहास माने,युवासेना शहर प्रमुख प्रसाद पुजारी संताजी देसाई, उपविभाग प्रमुख दादासाहेब कामते, वैभव लायकर, महिला आघाडी उपता...

बदलापूर येथील घटनेचा सेलू मविआ कडून जोरदार निदर्शने करून निषेध.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.      सेलू : दि.24 शनिवार रोजी बदलापूर जि.ठाणे येथील प्रतिष्ठित संस्थेच्या शाळेत शिशुवर्गातील 3 वर्षीय बालिकांवर एका नराधामाने दोन वेळा अत्याचार केला.पहि ल्या वेळेस अत्याचार होऊन व शाळा प्रशास नास माहिती होऊन देखील गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे सदर घटनेची पुनरावृत्ती झा ली.भविष्यात अशा घटना घडू नयेत यासा ठी शासनाने कठोरात कठोर कार्यवाही करा वी अन्यथा महाविकास आघाडी सेलू तालुक्या च्या वतीने तीव्र आंदो लन छेडण्यात येईल व त्यातून कायदा व सु व्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील या प्रकारचे निवेदन तह सील कार्यालय सेलू येथे देत सदरील घटने चा निषेध करण्यात आला.यावेळी अशोक नाना काकडे, पवन आडळकर, सुधाकर रोकडे, रामेश्वर बहिरट, रघुनाथ बागल, विठ्ठल काळबांडे, निर्मलताई लीपने, मुकुंद लहाने, मंगलताई कथले, विनोद तरटे, आनंद डोईफोडे, शेख दिला वर, वैभव वैद्य, सचिन धापसे, नरसिंग हरणे, गौस लाला, विठ्ठल महा राज कारके, शेषराव वाघमोडे,संजय गायके, रमेश डख, संतोष ठा कूर, गोविंदराव सोळं के, रमेश शिंदे, अरुण ताठे, अंकुश सोळंके, विष्णू ...

पालकांनी मुलांना चांगले संस्कार आणि संस्कृती शिकवावे. - अमरेश्वर महाराज

इमेज
रायबाग : पालकांनी मुलांना चांगले संस्कार आणि संस्कृती शिकवावेत.  कवलगुड्डा येथील अमरेश्वर महाराज म्हणाले की, गुरुंनी ज्येष्ठांचा आदर करायला हवा.       गुरूवारी सायंकाळी तालुक्यातील जलालपूर गावात बसवनगुडी जत्रा महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मुलांनी मानवी मूल्यांचा अंगीकार करायला शिकले पाहिजे आणि चांगला समाज घडवण्यासाठी हातमिळवणी केली पाहिजे. असे ते म्हणाले.    गाव पक्षाध्यक्षा विद्या जगदाळे, राजू जाधव, डॉ.टी.  एस.पाटील, हनुमंत चौगला, चिदानंद शिरगावे, संतोष चौगला, महादेव पाटील, शंकर शिरगावे, बसगौडा पाटील, श्रीशैल चौगला, बसवराज अवण्णावार, सत्यप्पा पाटील, नामदेव कांबळे, गंगाधर खंडाळे, कलगौड पाटील व पंचायत सदस्य उपस्थित होते.

बोरगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी पिंटू कांबळे तर उपनगराध्यक्षा पदी सौ भारती बाळासाहेब वसवाडे यांची बिनविरोध निवड..

इमेज
बोरगाव/प्रतिनिधी         गेल्या 33 महिन्याच्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत नगराधक्ष  पदासाठी पिंटू तुकाराम  कांबळे यांची तर उपनगरध्यक्ष पदी व सौ भारती वसवाडे यांची अविरोध निवड झाली.त्यामुळे पुन्हा बोरगाव नगरपंचायतीवर उत्तम पाटील गटाचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून आले.विजयाची वार्ता पसरताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत,गुलालाची उधळण करत विजोत्सव साजरा केला.निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी काम पाहिले.          बोरगाव नगरपंचायत अध्यक्षपदासाठी एससी आरक्षण तर उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी ए महिला आरक्षण निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीवर 17 पैकी 16 जागेवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी एससी मधून पिंटू कांबळे यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी ए मधून सौ भारती वसवाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सदरची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध असल्याची घोषणा निवडणूक अधिकारी  प्...

तनिष्का तेलभरे ची राज्य स्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  अखिल भारतीय  विभागीय स्तरावर विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल प्रथम. सेलू : दि. 22 ऑगस्ट श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु. तनिष्का अनंत तेलभरे वर्ग 9 वी हिने अखिल भारतीय मराठवाडा विभाग स्तरीय विज्ञान मेळा व्यात प्रथम क्रमांक मिळवला.अखिल भारतीय विभागस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, हिंगोली,  परभणी जिल्ह्यातील निवड झालेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सुरुवातीला विद्यार्थ्यांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा घेण्यात आली, तसेच विद्या र्थ्यांचे भाषण कौशल्य, पावर पॉइंट प्रेझेंटेशन  व परीक्षकांनी विद्या र्थ्यांना विचारलेल्या प्रश्नाच्या आधारे विभागीय विज्ञान मेळाव्यासाठी मराठ वाडा विभागातुन दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तरी कुमारी तनिष्का अनंत तेलभरे या विद्यार्थिनीने सर्व कसोट्यावर उत्तम मार्क्स मिळवून अप्र तिम प्रदर्शन केले व सर्वांची मने जिंकली....

एक दिवसीय अभिनय व नृत्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि. 23 रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू येथे एक दिवसीय अभिनय व नृत्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख पाहुणे परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध अभिनयकार मा.विनोद डावरे व मा. अतुल वाघळकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यकार ऐश्वर्या डावरे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्या सौ. प्रगती क्षीरसागर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्प नेतून कला क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले .नृत्य, नाट्य, चित्रपट यां सा रख्या प्रयोगीय कलां मध्ये नटाने आशय प्रकटनासाठी कृती, आविर्भाव, भाषण व वेशभूषा या साधनां द्वारा केलेली भूमिकेची भावाभिव्यक्ती म्हणजे अभिनय.अभिनयामध्ये कौशल्यांची विस्तृत श्रेणी समाविष्ट असते, ज्यामध्ये चांगली विकसित कल्पना शक्ती, भावनिक सुविधा, शारीरिक अभिव्यक्ती, स्वर प्रक्षेपण, बोलण्याची स्पष्टता आणि नाटका चा अर्थ लावण्याची क्षमता यांचा समावेश हो...

हातकलंगले विधानसभा चौरंगी लढत काटे की टक्कर होण्याची दाट शक्यता

इमेज
288 हातकलंगले विधानसभा मतदारसंघ यामध्ये उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या साठी महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे व महायुतीतून भाजप जनसुस्वराज्य शक्तीचे दलितमित्र अशोकरावजी माने व डॉ सुजित मिणचेकर हे अपक्ष किंवा कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात हे पाहावे लागेल  ताराराणी पक्षाचा उमेदवार या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे यांनी उभे करणार असल्याचे जाहीर केले असून त्यांचे या 15 गावांमध्ये समसमान वर्चस्व असून  खासदार माने गटाची लोकसभेनतंर या तालुक्यावर पकड मजबुत झाली असुन त्याच्या साथी शिवाय हातकणंगलेचा आमदार होणे अद्याप तरी शक्य नाही खरी लढत वास्तविक राजूबाबा आवळे,अशोकराव माने सुजितराव मिणचेकर चौथा ताराराणी आघाडीचा उमेदवार  यामध्येच होईल सध्या तरी ही तीन नावे आघाडीवर असताना दिसत असून  विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्ष बाजूला ठेवून गटा तटाचे राजकारण होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असून  गेल्यावेळी निसटता पराभव झालेले पण पराभवाला खचून न गेलेले दलितमित्र अशोकरावजी माने  हे पूर्ण ताकदीनिशी महायुतीचे उमेदवार म्हणून सध्या तरी आघाडीवर असून...

माणकापूरात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

इमेज
माणकापूर - प्रतिनिधी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय , शाखा माणकापूर   येथे आज रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास हुपरी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र संचालिका राजयोगीनी बी.के. सुनिता दिदी, राजयोगी बी.के. वसंत भाई, बी.के. गीता बहेनजी उपस्थित होत्या. राजयोगीनी बी.के. सुनिता दिदी यांनी मनोगत व्यक्त करताना, आपण रक्षाबंधन हा सण फक्त परंपरा म्हणून साजरा करतो. पण राखीचा वास्तविक अध्यात्मिक अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. रक्षासुत्र म्हणजे फक्त धागा नसून सात्विकतेचं आणि पवित्रतेचं प्रतिक आहे. मनातील विचार सात्विक, शुद्ध असतील तर  मुखातून निघणारी वाणी देखील सात्विक आणि आनंददायी बनते. विचार आणि वाणी सात्विक बनवले तर कर्म ही शुद्ध सात्विक बनत जातात. परिणामी सात्विक, पवित्र, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडते. मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धी म्हणजेच रक्षाबंधन असा रक्षाबंधनाचा अध्यात्मिक अर्थ आहे. अशा चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्वाच्याद्वारेच सुसंस्कृत आणि एकी असलेला समाज घडत असतो. आणि असा सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय ...

घरगुती सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक.

इमेज
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील सदलगा शहरात घरामध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.     बीड, महाराष्ट्रातील सूर्यकांत शेळके (५५) या शेतमजूर म्हणून कामावर आल्या होत्या.  तर आणखी एक मजूर ज्ञानोदय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिक्कोडी तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सिलिंडरच्या स्फोटाच्या तीव्रतेमुळे शेजारच्या घराची भिंतही कोसळली.  भिंत दोन मुलांवर पडली असून दोन मुले किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर सदलगा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सदलगा पोलीस ठाणे अंतर्गत घटना घडली.

शिये येथे 10 वर्षाच्या मुलीचा अत्याचार करून खून. कोल्हापूर शहर या घटनेने हादरले.

इमेज
कोल्हापूर - शिये येथे रहात   असलेल्या 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा गुरुवार दि.22/08/2024 रोजी दुपारी बाराच्या सुमारास शिये येथील रामनगर येथे असलेल्या पटकुडी नावाच्या ओढ़यात गंभीर जखमी अवस्थेत आढ़ळल्याने तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा सव्वा दोनच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.   अधिक माहिती अशी की ,यातील मयत मुलगी रा.सबार जि.कैमुर बिहार राज्यातील असून तिचे आई वडील शिये येथे फौंड्री व्यावसायिकाकडे नोकरीस आहेत.बुधवारी तिचे आई वडील कामाला जात असताना घरी असलेल्या मुलीच्या मामाला मुलीकडे लक्ष देण्यास सांगून ते कामाला गेले त्या वेळी मुलीचा मामा झोपला असताना सदर मुलगी घरा बाहेर पडल्याचे समजते.तिची आई घरी आल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे पाहुन तिचा शोध घेत असताना सदर मुलगी पटकुडी नावाच्या ओढ़यात जखमी अवस्थेत मिळाल्याने तिला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारा पूर्वी मृत्यु झाला.या घटनेची माहिती पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलिस स्टाफ मोठ्या संख्येने शवविच्छेदन विभा...

जलालपूर येथे बसवनगुडी जत्रेनिमित्त लक्ष दिपोत्सव महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
रायबाग : यक्कांची गुरुदेव तपोवनाचे गुरुपाद स्वामीजी आणि ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या जगदाळे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी तालुक्यातील जलालपूर गावात बसवनगुडी जत्रा सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित लक्ष दीपोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  तेव्हा गुरुपाद स्वामीजींनी उपस्थित राहून आशीर्वाद दिला, जत्रा आणि सण हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत.  आजच्या तरुणांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या आहारी न जाता आपली वैभवशाली संस्कृती जतन करण्याचे काम केले पाहिजे.   नरसिंगेश्वर स्वामीजी, हनुमंत चौगला, संजू चौगला, बसवराज अवण्णावरा, सत्यप्पा चौगला, चिदानंद शिरगावे, संतोष चौगला, गिरीगाव कळमेश्वर आश्रमाचे महादेवा पाटील.    लक्ष दीपोत्सवात शंकर शिरगावे, श्रीशैला चौगला, बसगौडा पाटील, वसंत कांबळे, नामदेव कांबळे, संजीव जाधव, गंगाधर खंडाळे यांच्यासह पंचायत सदस्य व गावातील भाविक सहभागी झाले होते.

हुपरीतील नागरिकांची आरोग्य धोक्यात आरोग्यसेवेची विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तर आरोग्य अधिकारी,तालुका अधिकारी व मुख्याधिकारी यांनी जबाबदारी झटकली.

इमेज
हुपरी शहरांमधील केंद्रीय आरोग्य केंद्र प्रमुख जाधव मॅडम यांच्याशी आज हुपरीतील बोगस डॉक्टरांच्या बाबत चर्चा केली असता त्यांच्याकडे मिळाले माहिती अशी की त्यांनी सर्वे करून रिपोर्ट तालुका आरोग्य विभागाकडे तसेच जिल्हा चिकित्सालय यांच्याकडे पाठवले आहेत अशी माहीती सांगितले  त्यांनी पाठवलेल्या रिपोर्ट पाहता त्यामध्ये काही चुकीच्या त्रुटी आढळून आल्या  त्यावर त्यांनी हा रिपोर्ट मागील असल्यास सांगितले  त्यांना सर्वे बाबतची माहिती विचारली असता दरवर्षी सर्वे करणे बंधनकारक असुन त्यानी मागील तसे पुढे डाटा भरुन विना चौकशी अतिमं अहवाल दिला असुन यामधे गावाच्या आरोग्य विषयी इतका निष्काळजी पणा का हा विषय गंभीर पणाने घेणे गरजेचे होते शहरातील डॉक्टरांचे सर्वे बरेच वर्षे झाले नसल्याचे निदर्शनास आले.  बोगस डॉक्टरांच्या कारवाईबाबत विचारणा केली असत.  कारवाई करण्याचा अधिकार नगरपरिषदकडे असल्याचे त्यांनी सांगितले  याबाबत नगर परिषदेमध्ये विचारणा केली असता अशी माहिती समोर आली की सदरनगर परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने बोगस डॉक्टरच्या कारवाई करणेचा अधिकार आम्हास प्राप्त ...

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधि कारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचा निषेध मोर्चा गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : आज दि.21 रोजी महाराष्ट्रामध्ये  बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत निंद नीय मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे, तीन ते चार वर्ष वयो गटाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत कार्यरत असलेल्या एका कर्मा चाऱ्यांने अत्याचार केला,आणि त्या पी डित मुलीच्या आई- वडिलांनी जेव्हा संबं धित पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यां ना 12 ते 13 तास ब सून ठेवलं यामुळे नागरिकांमध्ये पोलि सांच्या विरोधात रोष तयार झाला आणि नागरिकांनी तीव्र आंदो लन केले त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उम टले आहे, तर सरकार वेगवेगळे इव्हेंट निवड णुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार करण्यात मग्न आहे. आमच्या माय बहिणींना तुमची तुटपुंजी मदत नको पा हिजे ती सुरक्षा अशा शब्दात सरकारला प्रत्यु त्तर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी शेकडो कार्यक र्त्यांना घेऊन आज बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 30 वाजेच्या सुमारास परभ णी जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकार विरोधात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदो लन करत परभणी जिल्हाधिकारी यांच्या ...

कवि सरकार इंगळी यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार जाहीर., वांद्रा मुंबई येथे होणार सन्मान .

इमेज
हातकणंगले प्रतिनिधी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ साठी हातकणंगाले तालुक्यातील इंगळी गावचे प्रसिद्ध पत्रकार लेखक कवि सरकार( विलास पाटील ) इंगळी यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .    कवि सरकार इंगळी यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . मुंबई वांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह स्वामी विवेकानंद रोड एसव्ही रोड येथे २५ ऑगस्टला मान्यवरांच्या हस्ते देणेत येणार आहे . असे निवडपत्र त्यांना मुख्य संयोजक समितीचे पदाधिकारी यांना दिले आहे . मा नागेश हुलावळे ' संस्थापक वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई . नॅशनल लायब्ररी ' डि पी .ई सोसायटी वांद्रा नाईट हायस्कूल त्याचप्रमाणे रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर प्रमोद सुर्यवंशी मुंबई योगेश हरणे पुणे व आयोजक समिती सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत .

चिक्कोडी येथे भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

इमेज
प्रतिनिधी राजू मुंडे चिक्कोडी, चिक्कोडी केंद्रात भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने भाजप सरकारने देशातील तपास यंत्रणा आणि राज्यपाल कार्यालयाचा गैरवापर केला आणि राजकीय फायद्यासाठी काँग्रेस पक्षाचे माननीय मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपाल गेहलोटा यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला.   या प्रकरणात   कु.प्रियांका सतीश जारकीहोळी लोकसभा सदस्य व चिक्कोडी जिल्हाध्यक्ष श्री.लक्ष्मणराव चिंगळे रायबाग काँग्रेसचे उमेदवार श्री.महावीर मोहिते KPCC किसान युनिट राज्य उपाध्यक्ष श्री.दस्तगीर राजीसाबा कागवडे चिक्कोडी जिल्हा महिला अध्यक्षा कु.निर्मला पाटील व सर्व ब्लॉक अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

मोरब ग्रामपंचायतीत सोमवारी नूली चंदैयानवर जयंतीोत्सव साजरी

इमेज
रायबाग : तालुक्यातील मोरब ग्रामपंचायतीत सोमवारी नूली चंदैयानवर जयंतीोत्सव साजरा करण्यात आला.     दिवाकर असोदे, श्रावण कांबळे, परशुराम भजंत्री, प्रकाश भजंत्री, आनंदा सप्तसागरे, सदाशिव असोदे, कल्लाप्पा असोदे, अजित दलवाई, उमेश असोदे, आनंद असोदे आदी उपस्थित होते.

मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये छायाचित्र दिन, रक्षाबंधन सोहळा उत्साहात

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात "कै. बाबासाहेब पाटील यांचा स्मृतिदिवस तथा जागतिक छायाचित्रदिन उत्सहात संपन्न झाला .  मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै. बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .स्वागत व प्रास्ताविक सौ. जयश्री पाटील  यांनी व्यक्त केले . फोटोग्राफर  शुभम बावचे विनायक चुडमुंगे  श्रीमती सुशिला पाटील , सौ.आशाताई पाटील , मनोज पाटील , महेश पाटील , सौ. अपेक्षा पाटील यांचा संस्थेचे सचिव मेजर के. एम् भोसले  यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला . फोटोग्राफर शुभम बावचे यांनी आपल्या मनोगतातू आपल्या स्वतःहच्या परिस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांना करून आपल्या कार्याची देखील थोडक्यात माहिती दिली. सौ. आशाताई पाटील यांनी कै. बाबासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती दिली .संस्थेचे सचिव प्रा. मेजर के. एम् भोसले  यांनी आपल्या मनोगतातून कै.बाबासाहेब पाटील यांनी संस्थेच रोपटं लावण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचं योगदान आ...

रांगोळी येथे कॉक्रीटीकरण रस्ता उद्घाटन शुभारंभ

इमेज
(विशालक्रांती प्रतिनिधी - राजेंद्र पुजारी)  जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री व आमदार डॉ विनयरावजी कोरे (सावकार) व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या 2515 योजनेतून रांगोळी ता. हातकणंगले या गावच्या विकास कामांसाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता,,,मौजे रांगोळी येथील वॉर्ड क्रमांक 4 मधील  पांडुरंग मंदिर ते  बेडक्याळे गल्ली  येथे काँक्रीटीकरण रस्ता शुभारंभ उद्घाटनसोहळा  हातकणंगले विधानसभा प्रमुख दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते व लोकनियुक्त सरपंच सौ संगीता सुभाष नरदे वहिनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला,,,           यावेळी उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,ग्रा, प, सदस्य किरण कमते, सुदर्शन पाटील,रजनीकांत माने,हुमायून मुलाणी,सौ सविता मोरे,सौ आश्विनी जंगले,सोनाली कांबळे,सौ स्वाती कांबळे,सौ अश्विनी मगदूम, सुभाष नरदे,माजी सरपंच नारायण भ...

बस आणि कारच्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू.

इमेज
गदग प्रतिनिधी राजू मुंडे, गदग येथील अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी गदग जिल्ह्याच्या कोन्नूरच्या हद्दीत घडली.  या अपघातात हावेरी येथील रुद्रप्पा अंगडी (55), पत्नी राजेश्वरी (45) आणि मुलगी अश्वर्या (16) यांचा मृत्यू झाला.  मुलगा विजया (12) याचा जागीच मृत्यू झाला.  कलापुरा बसवेश्वर देवतेच्या दर्शनासाठी जात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाणाऱ्या कारची इलाकलहून हुबळीकडे जाणाऱ्या बसला धडक बसल्याने हा अपघात झाला.  ही घटना नारागुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.  पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

विठ्ठल रुक्मिणी ट्रॅक्टर वारी निमित्त भोज येथे महाप्रसाद.

इमेज
प्रतिनिधी राजू मुंडे - विठ्ठल रुक्मिणी ट्रॅक्टर वारी निमित्त भोज येथे श्री.अजित माळी यांच्या घरी देव बसवने पूजा महाप्रसाद कार्यक्रम संपन झाला.  यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील,बुडा अध्यक्ष व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सर, मा.श्री.राजेंद्र पवार वड्डर,- माजी जिल्हा पंचायत सदस्य...* यांनी भेट देवून आशीर्वाद घेतला यावेळी गावकरी व भोज वारकरी संप्रदाय यांच्या वतीने सत्कार करण्यात आला...... यावेळी ग्राम पंचायत सदस्य - फिरोज सनदी, बाबसाहेब मोरे, जिवन थोरबोले, व राजू कुरुंदवाडे, प्रकाश पूजारी, अमृत कोइंगडे, ओंकार ढवळे, पवन हींदळकर, दगडू वड्डर,रोहीत माळी, अभिजित माने,मान्यवर,नागरिक,भोज भोजवाडी भजणी मंडळ,भोज ट्रॅक्टर दिंडी वारकरी संप्रदाय मंडळ व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

निपाणी यरनाळ ग्रामपंचायतचा संसद प्रियांका जर्किवडी यांच्या हस्ते उद्घाटन.

इमेज
निपाणी प्रतिनिधी राजू मुंडे -  चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदार कुमारी प्रियांका सतिश जारकीहोळी यांच्या हस्ते व ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मीबाई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली  व सहकाररत्न श्री उत्तम आण्णा पाटील यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्तिथीत यरनाळ येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उदघाटन समारंभ पार पडला.         यावेळी निपाणीचे माजी आमदार सुभाष जोशी सर, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सर, निपाणी ब्लॉक कॉग्रेस अध्यक्ष राजेश कदम, रोहन साळवे, माजी ज़िल्हापरिषद उपाध्यक्ष पंकज पाटील,निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, ग्राम पंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्तिथ होते.

ऑडिटर शिवाजी परीट यांचा सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सत्कार

इमेज
कोल्हापूर             महाराष्ट्र राज्य अधिकृत असोसिएशनचे सदस्य शिवाजी परिट यांची कामाची दखल घेऊन सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी परिट यांचा विशेष सत्कार केला.यावेळी ध्वजारोहण धर्मादाय सह आयुक्त श्रीमती निवेदिता पवार यांच्या हस्ते, धर्मादाय उपायुक्त    कांचनगंगा सुपाते-जाधव, सहाय्यक आयुक्त वाळके ,अधिक्षक शिवराज नाईकवाडे व सहाय्यक धर्मादाय आयुक्त मधील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या वेळी विविध मान्यवरांचा सत्कार सन्मान  चिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार  करण्यात आला. अधिकृत लेखापरीक्षक यांनी ऑफिसमध्ये केलेल्या कामाची नोंद घेऊन राज्य अधिकृत ऑडिटर असोसिएशन सदस्य श्री शिवाजी परीट यांच्यासह वासुदेव  कोष्टी, रमेश माळी,श्रीकांत पाटील, संदीप जोशी,श्रीकांत चिंडक, गुरुनाथ कुरणगे, पुंडलिक भिंगुडे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यालयीन  सेवक वर्ग, वकील, आणि अधिकृत लेखापरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवपदी धर्मादाय कार्यालयाचे अध...

केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेची कार्यकारीनी बैठक यशस्वी रित्या संपन्न

इमेज
इचलकरंजी येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पत्रकार संपादक संघटनेच्या वातीने बैठक घेण्यात आली तसेच मान्यवरांने आपले विचार मांडले व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिगाडे यांनी महत्वाचे विषय हाती घेतले तसेच केंद्रीय  संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी सघटनेच्या राष्ट्रीय सदस्या  व पोलीस मित्र संघटनेच्या महिला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा आणि राष्ट्रवादी  युवती उपाध्यक्ष कुमारी मोनिका जाधव यांचे वाढदिवसाचे औचित साधून आज इचलकरंजी येथे केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेची बैठक घेण्यात आली.   सदरची ही बैठक प्रहार न्यूज चे उपसंपादक तथा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नागराज हजारे यांनी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या आदेशाने  केले होते.  या बैठकीवेळी  नागराज हजारे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झाली.   आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी अनेक महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर कित्येकांनी त...