संत रामपालजी महाराज यांचे रविवारी LIVE सत्संग कार्यक्रमाचे आयोजन .

यड्राव (प्रतिनिधी )                                                       सर्व कर्म बंधनातून मुक्त करणारे संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक 22 रोजी करण्यात आले आहे . 
     सदर कार्यक्रम  श्री. सिद्धिविनायक मंदिर लगत, म.न . पा. प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर शाळा नं.32 चा हॉल जाधववाडी, कोल्हापूर. 
येथे जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संगचे (प्रवचन) आयोजन प्रोजेक्टरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.                 या सत्संग मध्ये समाजास असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि 100% खात्री होईल की मोक्ष व पूर्ण परमेश्वर मिळणे अगदी सोपे आहे. त्यांना पवित्र धर्मग्रंथांच्या आधारे संत रामपाल जी महाराज यांनी उत्तरे दिलेली आहेत.(जसे की , श्रीमद्भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, श्री गुरुग्रंथ साहेब, बायबल, कुराण इ.) तरी सर्व भक्त समाजास विनंती आहे की, त्यांनी या सत्संगला वेळीच उपस्थित राहून संत रामपालजी महाराज यांच्या अमृतरूपी वाणीचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच संत रामपाल जी महाराज यांच्या कडून निःशुल्क नामदिक्षा प्राप्त करून आपले आत्म कल्याण करून घ्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे . सदर सत्संग कार्यक्रम रविवार  दिनांक : 22/12/2024,रोजी  सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आहे . सदर सत्संग कार्यक्रमाचे आयोजक संत रामपालजी महाराज नामदान केंद्र कोल्हापूर व समस्त अनुयायी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.