विधानसभा निवडणुकी संदर्भातील वक्तृत्व स्पर्धेत क्षितिजा खजिने हिचे यश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : परभणी जिल्हा मतदान जनजागृती अभियान (SVEEP) यांच्या वतीने विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजि त वक्तृत्व स्पर्धेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलूची विद्यार्थिनी क्षितिजा कैलास खजिने हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.  
शालेय गटातून स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून क्षितिजा हिने शाळेचे आणि शिक्षकांचे नाव उंचावले आहे. तिच्या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे,शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर शिक्षक, आणि मित्रपरिवाराने अभिनंदन केले. क्षितिजाच्या या यशाने तिच्या मेहनतीचे फळ आणि वक्तृत्व कौशल्याला एक नवीन ओळख मिळाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.