शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था वर्धापनदिन उत्साहात संपन्न.

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कुल,खोतवाडी येथे संस्था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरवात आचार्य प.पु.108 शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.
         यानंतर विद्यालयाचे अध्यापक श्री.हेमगिरे एस.के.यांनी आपल्या मनोगतातुन संस्थे विषयी माहिती सांगितली.यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन संस्थेनी केलेल्या कार्याची,संस्थेमध्ये राबलेल्या उपक्रमाविषयी माहिती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा यांनी आपल्या मनोगतातुन  संस्था वर्धापनदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.तसेच संस्था वर्धापन दिना निमित्त विद्यालयामध्ये देशभक्तीपर गीत-गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
     या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.समाजे सी.बी.यांनी केले तर आभार श्री.कांबळे एस.एम.यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.