यड्राव परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यड्राव (ता. शिरोळ) येथील रेणुका नगर येथील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे येथील नागरिकांना रस्त्यांवरून सुरक्षित चालणेही कठीण झाले आहे. या समस्येचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे.
       रेणुका नगर व परिसरातील भटके कुत्रे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे अनेकांना भीतीने घराबाहेर पडणे टाळावे लागत आहे. शाळेत जाणारी लहान मुले, सकाळी फिरायला जाणारे नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांना या कुत्र्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या भटक्या कुत्र्यांनी अनेक वेळा चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. तसेच रस्त्यावर अचानक येऊन वाहनांसमोर उभे राहिल्यामुळे अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा प्रकारांमुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी ग्रामपंचायतीने तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.