इचलकरंजी नाईट हायस्कूल विद्यार्थि व पालक मीटिंग संपन्न
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर नाईट हायस्कूल १० वी च्या विद्यार्थि व पालक यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व प्रथम
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या फोटोला विद्यार्थि पालक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक किसन गवळी, वर्ग शिक्षक यू.आर.चौगुले यांनी मार्गदर्शन केले.
दिन दलीत गरीब कष्टकरी लोकांच्या मुलासाठी कोल्हापूर जिल्हातील उचदर्जाचे नाईट हायस्कूल आपल्या शहरात आहे
ज्या मुलांना आर्थिक परस्थितीमुले शिकता आले नाही,व शिकता येत नाही, तसेच 40 ते 50 वय गटातील महिला व पुरुष,नोकरीला अडतळा येत आहे ते ही दिवसभर काबाड कष्ट करून रात्रीची शाळा शिकण्यास येतात.तरी असे अनेक विद्यार्थी या शिक्षणा पासून वंचित आहे. आश्या विदयार्थ्यांनी रात्रीची शाळा शिकण्याची संधी सोडू नका, "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही" यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. यावेळी जी.आर शिंदे, एस. एम. पाटील, ये .बी.पाटील, एस .व्ही .चव्हाण इत्यादी शिक्षक विद्यार्थि व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या