बांधकाम कामगारांची वेबसाईट व पोर्टल पूर्ववत सुरू करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर निदर्शने

इचलकरजी - बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज  बाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवला आहे. तो तो सुरु करा जाहीर केलेला बोनस ( सानुग्रह अनुदान) द्या या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आज दि २ रोजी  जोरदार निदर्शने करण्यात आली.  
.     केवळ तालुकास्तरावर सुरू केलेल्या ठेकेदाराच्या सुविधा केंद्रावरूनच बांधकाम कामगारांचे सर्व प्रकारचे अर्ज सादर करण्याची अट आहे. येथे रोज  पन्नास कामगारांची अर्ज दाखल करण्याची  अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते यामुळे हजारो कामगारांची कामे अडकून पडलेली आहेत.  कामगारांच्या विविध योजना पेक्षा ठेकेदारावर हजारो कोटी खर्च केले आहेत. हे केवळ मंडळाच्या  पैशाची उधळपट्टी सुरु आहे. ती थांबवावी व पुर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल व वेबसाईट सुरू करावी जाहीर केलेला दिवाळी बोनस ( सानुग्रह अनुदान) कामगारांच्या खात्यावर सोडावे आदी मागण्यांचे निवेदन ही यावूळी देणेत आले 
.       सदर निवेदन वरीष्ट पातळीवर पाठवून सकारात्मक विचार करणेचा प्रयत्न करु असे अश्वासन निदर्शनातील शिष्टमंडळा सहाय्यक कामगार आयुक्त मा. जानकी भोईटे यांनी दिले .
 .       यावेळी कॉ. आनंदा गुरव, गणेश तडाखे, संजय खानविलकर, अशोक सुतार, जयप्रकाश कांबळे, महेश लोहार, आकाश बनसोडे, अभिजीत आवळे, सचिन भोरे, राहुल दवडते, राहुल शिंदे, सतिश  वायदंडे, ,  परसराम कत्ती, सचिन खाडे, भीमराव जामकर, तोफिक नायकवडी, दीपक रेपाळ, अण्णा हालगेकर, अजय रेडे, अनिल जाधव, विकी माने, भैय्यासाहेब धनवडे, गणेश वायदंडे, राहूल चिनके आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी निदर्शनात उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.