मलिकवाड सरस्वती महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शोभा पाटील, तर उपाध्यक्षपदी सुलोचना कट्टीकर यांची बिनविरोध निवड
मलिकवाड तालुका चिकोडी येथील श्री सरस्वती महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मलिकवाड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध करण्यात आली. मंगळवारी संस्थेच्या अध्यक्षपदी शोभा निवास पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सुलोचना बाबासाहेब कट्टीकर यांची बिनविरोध निवड झाली. तत्पूर्वी संस्थेच्या एकूण बारा संचालकांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून बेळगाव येथील जिल्हा रजिस्टर कार्यालयाचे आर. बी. पाटील यांनी काम पाहिले. संस्थेमध्ये सामान्य महिला गटातून 9, ओबीसी ए गटातून 1, ओबीसी ब गटातून 1, एससी 1 अशा संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेची बिनविरोध निवडणुक झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी सर्व सभासदांचे आभार मानले. तसेच नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
यावेळी संस्थेच्या सभासद पल्लवी राजेंद्र पाटील, यशोदिता अभिजीत पाटील, भारती विजय बाकळे, विजेता इंद्रजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शोभा निवास पाटील व उपाध्यक्षा सुलोचना कट्टीकर यांनी निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार केल्याबद्दल सर्व सभासद महिला, ठेवीदार, ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे प्रधान व्यवस्थापक राजेंद्र लक्ष्मण पाटील, रावसाहेब कुंभार, राजू मुल्ला, संजय वडगावे, त्रिशला भेंडीकटगे, किरण पाटील, निर्मला शिंदे, अक्षय उंदुरे तसेच संस्थेचे कर्मचारी, संचालक उपस्थित होते.
टिप्पण्या