डिसेंबर महिना उजाडला की सर्व शाळांना वेध लाग ते म्हणजे स्नेहसंमेलनांचे.
डिसेंबर महिना उजाडला की सर्व शाळांना वेध लाग ते म्हणजे स्नेहसंमेलनांचे. शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायतीच्या पटांगणावर संपन्न झाला.
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायात सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी सभापती, माजी सरपंच, मान्यवरांसह पालक उपस्थित होते. केंद्रप्रमुख संजय निकम, केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे, प्रसिद्धी प्रमुख दिलीप शिरढोणे यांनी शुभेच्छा दिल्या.
गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीताच्या तालावर मनसोक्त ठेका धरुन उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या अदाकारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच शिवाय रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षिसे दिली.
नृत्यदिग्दर्शन विकास कांबळे व कु. योजना पवार यांनी केले. बाळू यादव यांनी सूत्रसंचलन केले. कु.रुचिरा पाटील, कु.देवयानी नेर्ले, कु.स्नेहा अकिवाटे यांनी निवेदन केले.
मुख्याध्यापक सुभाष तराळ यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीबाबतची माहिती दिली. विविध गुणदर्शनासाठी बाबालाल बाणदार, सतिश यळगुडे, अर्चना पाटील, धनश्री होनमाने, गीता ढवळे, सरीता पाटील यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या