आजरा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष युवराज देसाई यांची उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर यांच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवा रत्न पुरस्कारसाठी निवड

प्रतिनिधी (गडहिंग्लज विभाग डॉ एस जी पोवार )  आजरा  तालुक्यातील  पोश्रातवाडी गावचे  पोलीस पाटील व  आजरा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष  युवराज देसाई  यांची जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवारत्न  पुरस्कारसाठी  निवड झाली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्काराचे  वितरण होईल अशी  माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे  कोल्हापूर संपर्क प्रमुख डॉ. एस. जी. पोवार यांनी दिली. श्री. युवराज  देसाई यांना          जिल्हास्तरीय  आदर्श पोलीस पाटील सेवारत्न  पुरस्कारासाठी  निवड झालेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहें.        द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा  आयोजित विशेष शानदार पुरस्कार  वितरण सोहळयात विविध  क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तीचा संस्थाचा पुरस्कार देऊन  दिगग्ज मान्यवरांच्या  शुभहस्ते  गौरव  करण्यात येणार  आहे.त्यानी शेती व्यवसाय सांभाळत सन 2012 पासून गावात पोलीस पाटील  म्हूणन  कार्यरत असून यामध्ये कायदा सुव्यवस्था  राखण्याबरोबरच  गावातील महसूल व पोलीस प्रशासनाच्या  जबाबदारी उत्तम प्रकारे साभाळणे, जातीय सलोखा, सण उत्सव, गावातील तंटे  गावातच मिटवणे सह आदी प्रभावी कामे पार पडल्यामुळे  
सन २०१७ ला जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार जिल्हा पोलीस प्रमुख श्री संजय मोहीते  व सन २०१२ ला पोलीस पाटील म्हणून नियुक्ती त्यानंतर पोलीस पाटील संघटनेत सचीव व नंतर तालुका अध्यक्ष म्हणून आजपर्यंत कार्यरत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सखी सावित्री समिती चे अध्यक्षपद ही आहे, सन २०१७ ला जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील म्हणून एस. पी. ऑफीस कडून सन्मान, २०१८ ला पुन्हा कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पोलीसांना सहकार्याबद्दल आजरा पोलीस ठाणे च्या वतीने प्रशस्तीपत्र देवून गौरवणेत आले, कोरोना काळात गावात परिस्थिती नियंत्रणात ठेवले बद्दल तहसिल कार्यालय आजरा, पोलीस ठाणे आजरा, व उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांच्या वतीने प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करणेत आले, त्याच प्रमाणे निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेवून काम केलेने निवडणूक कार्यालय आजरा यांनी ही सन्मानित केले आहे हे करत असताना शेती कडे ही तितकेच लक्ष देऊन सन 2022 व सन 2023 ला तालुकास्तरीय भात पिक स्पर्धेत अनुक्रमे तिसरा व दुसरा क्रमांक पटकावला .  यांची जिल्हास्तरीय  आदर्श पोलीस पाटील सेवारत्न पुरस्कारसाठी  निवड झाल्यामुळे  त्याचे सर्व स्तरातून, मान्यवर, मित्रपरिवार व नाते वाईकांकडून  स्वागत व अभिनंदन होत आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.