अभिनेता नृत्य दिग्दर्शक राजेश काळे यांना साई कला गुणगौरव 2025 पुरस्कार जाहीर.
10 जानेवारी रोजी शिर्डीत हॉटेल शांती कमल येथे भव्य साई कला गुणगौरव राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळा ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने साई कला गुणगौरव पुरस्कार 2025 या पुरस्काराकरिता अध्यक्ष माननीय श्री सुदाम संसारे सर सोहळा समितीद्वारे बुलढाणा जिल्हा, पिंपळगाव काळे येथील अभिनेता,नृत्य दिग्दर्शक क्षेत्रातील आपल्या भरीव योगदानाची दखल घेऊन साई गुण गौरव पुरस्कार 2025 करिता निवड करण्यात आली आहे.
प्रसिद्ध अभिनेता राजेश काळे फार्मासिस्ट आहे बुलढाणा जिल्हा संघटन सचिव, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या पदावर असून आपली अभिनय व नृत्य कला जोपासत आहे. राजेश काळे यांनी तू फक्त हो म्हण, रावडी एक डाव भानगडी चा, कल्टीमार या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. कुणबीच पोर या सिरीयल मध्ये सुद्धा काम केले आहे. आपल्या कुशलतेने नृत्य आणि कला क्षेत्राचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवाल यासाठी कार्यरत रहाल आपल्याकडून अपेक्षा आहे. साई गुणगौरव पुरस्कार 2025 जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनेता राजेश काळे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .
टिप्पण्या