सामाजिक कार्यकर्त्या , सौ वंदना ताई हिरामणभाऊ आल्हाट यांची "इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या ,स्वागताध्यक्षपदी निवड

पुणे , मोशी : 05  जानेवारी 2025 रोजी मोशी येथे "इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रथमच मोशी च्या "भूमि कन्या, ला हा मान मिळणे हे मोशी करांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. 
सकल हिंदू समाज यांच्या वतीने महाआरतीच्या आयोजनात सौ. वंदनाताई हिरामण आल्हाट यांना आमंत्रित करण्यात आले होते  सकल हिंदू समाज मोशी यांच्या वतीने  (पत्रकार) राष्ट्रीय धर्म हिंदू संघटन  संघटन मंत्री, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री हंसराज पाटील, श्री प्रसादजी हांडे यांच्या हस्ते सौ वंदना ताई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 
सौ वंदनाताई यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधव, युवा वर्गां समोर आपले मनोगत व्यक्त केले,सामाजिक,सांस्कृतिक  धार्मिक, साहित्यिक कार्याची आवड लहानपणा पासुन जोपासणे, व ते आचरणात आणणे व त्याच्या वापर समाजासाठी कसा करता येईल हे पाहणे महत्वाचे आहे , समाजात चांगल्या कार्याला कधीही स्थान प्राप्त होते या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. 
. सौ वंदनाताई हिरामण आल्हाट या मोशी गावच्या कन्या असून त्यांना वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी आहे, ते सामाजिक कार्यात सतत सेवारत असतात. 
साहित्य, कला संस्कृतिचे जतन  व्हावे तसेच त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. मोशी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांचा नाव लौकिक आहे. 
या कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाज मोशी चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रविण भाऊ गोरे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मोशी करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.