नाईट कॉलेजच्या सौरभ आदमानेची पश्चिम विभागीय युवा महोत्सवासाठी निवड .
यड्राव (प्रतिनिधी ) : देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्था संचलित नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स मधील बी. ए. भाग 1 चा विद्यार्थी सौरभ आदमाने यांची पश्चिम विभागीय युवा महोत्सव 24 -25 साठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर च्या संघात निवड झाली. सदर महोत्सवात शिवाजी विद्यापीठासह पश्चिम भारतातील विद्यापीठाचे संघ सहभागी होणार आहेत. युवा महोत्सवाचे यजमान गणपत युनिव्हसिटी मेहसाणा गुजरात असून महोत्सव 4 ते 8, जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विरुपाक्ष खानाज यांच्या हस्ते सौरभ चा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सौरभ आदमाने याने महाविद्यालयाचा नावलौकीक वाढविला असून इतर विद्यार्थाना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असा आशावाद प्र .प्राचार्य डॉ. विरुपाक्ष खानाज यांनी व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यास शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले याचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणरावजी खंजिरे, उपाध्यक्ष बाळासाहेब मूरदंडे यांचे आशीर्वाद लाभले .
सत्कार प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा एफ एन पटेल प्रा .सौरभ पाटणकर, प्रा डॉ सपकाळ डॉ माधव मुंडकर, डॉ प्रवीण पोवार, प्रा प्रमोद काळे प्रा अभिजित पाटील डॉ जीवन पाटील, डॉ. सचिन चव्हाण तसेच महाविद्यालयाचे अधिक्षक श्री एस एन पटेल व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या