बेळगाव विधानसौद समोर सीमाभागातील यंत्रमाग व्यावसायिकांचा ठिय्या आंदोलन.

अधिवेशनात यंत्रमागधारकांना आमदार जोल्ले वहिनी कडून दिलासा ! दूरध्वनीवरून थेट संपर्क.

बोरगाव/ प्रतिनीधी.

बेळगाव येथील राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निपाणीसह सीमाभागातील बोरगाव,माणकापूर, कारदगा, नेज, ढोणेवाडी, या परिसरातील यंत्रमागधारकांनी थकित व वाढीव वीज बिले कायम स्वरुपी माफ करावे,या संदर्भात संतप्त यंत्रमाग व्यवसायिकांच्या सहभागाने काढलेल्या मोर्चास आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दूरध्वनी वरून संपर्क साधून आपण तुम्हा सर्वांच्या पाठीशी सदैव आहोत.शिवाय विधान सभेत आपल्या समस्येची व्यथा मांडून येणाऱ्या थोड्या दिवसातच आपण आपली थकीत विज बिले कायमस्वरूपी माफ करण्याचे आश्वासन देत यंत्रमाग धारकांना दिलासा दिला.

*शुक्रवार दिनांक 13 रोजी बेळगाव येथील विधानसौद समोर मानकापूर ते बेळगाव पायी चालत आलेल्या सर्व यंत्रमागधारकांना ठिय्या आंदोलनात दिलासा देत असताना त्या दूरध्वनी वरून बोलत होत्या.*
मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या वस्त्रोद्योग व्यवसायाला गेल्या काही वर्षांपासून वाढीव वीज बिलाच्या माध्यमातून मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वाढीव विज बिलाने यंत्रमाग व्यवसाय धोक्यात येऊन कोट्यावधींची थकीत बिले यंत्रमाग व्यावसायिकांच्या डोईजड झाली आहेत.त्यामुळे सीमाभागातील यंत्रमाग व्यवसाय हा पूर्णता ढासळला असून बहुतांश यंत्रमाग व्यावसायिक हे हा व्यवसाय बंद केल्याने कर्जबाजारी झाले आहेत.शिवाय शासनाच्या कोणत्याही सवलती यंत्रमानधारकांना मिळत नसल्याने काही व्यवसायिकांना तर दैनंदिनी रोजी-रोटीचा प्रश्न उद्भवू लागला आहे.याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या या यंत्रमाग व्यवसायिकांनी येथील हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून आपल्या मागण्या कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या उद्देशाने सीमाभागातील मानकापूर बोरगाव ते बेळगाव पर्यंत गेल्या चार पाच दिवसापासून पायी प्रवास करत मोर्चा द्वारे अधिवेशन दरबारी सहभागी होऊन विधानसभासौध गेट समोर 9/C ठिकाणी  ठिय्या आंदोलन मांडून संबंधित मंत्री महोदयाप्रमाणे अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन आपल्यावर उद्भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्याची विनंती केली, सरकार विरोधात अनेक घोषणाबाजी करून यंत्रमाग धारक वाचला पाहिजे अशा आशयाची मागणी केली. दरम्यान निपाणी भागाच्या आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या गैरहजरित संबंधित बोरगाव चे नगरसेवक व बोरगांव टेक्सटाइल पार्क चे अध्यक्ष शरदराव जंगटे यांच्या दूरध्वनीवर यंत्रमागधारकांशी संपर्क करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि लवकरच आपण शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याची ग्वाही दिली.

यावेळी हाल  सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद  जंगठे,  अजित कांबळे, जितेंद्र पाटील, सुहास डोमणे, भरत पाटील, अर्जुन कुंभार, महादेव स्वामी, मुद्द्यांना हांडे यांच्यासह बोरगाव मानकापूर ढोणेवाडी कारदगा,  नेज या परिसरातील असंख्य यंत्रमाग मालक व कामगार ,संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.