कु." श्रावणी अजित सस्ते पाटील, हिने दिल्ली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत " कांस्यपदक

कु." श्रावणी अजित सस्ते पाटील, हिने  दिल्ली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत " कांस्यपदक पटकावला, या बद्दल सकल हिंदू समाज मोशी शहर च्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला...
पुणे मोशी: त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या 68 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया [ SFGI ] कराटे स्पर्धेत .
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी मोशी गावची राष्ट्रीय खेळाडू उत्कृष्ट कराटे कौशल्याचे प्रदर्शन करत 17 वर्षाखालील 68 किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. 
या बद्दल सकल हिंदू समाज मोशीचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रविण भाऊ गोरे यांच्या पुढाकाराने श्री प्रकाश जी पाटील श्री वीरभद्र जी निरणे यांच्या हस्ते कु.श्रावणी हिचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्री फळ देऊन सन्मान करण्यात आला .
मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलच्या वतीने श्रावणी सस्ते हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत शाळेतील इयत्ता दहावीतील श्रावणी ने कराटे स्पर्धेत कांस्यपदक मिळवत उज्वल यश प्राप्त झाले. 
शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी हि प्रेरणादायी ठरली आहे. आज आपण मुलांना  शिक्षण देत असताना सुद्धा त्यांच्या मधील सुप्त गुण ओळखून त्यांना उचित मार्गदर्शन, व कलेची आवड निर्माण करून काहीतरी वेगळ करण्यासाठी प्रोत्साहित केल पाहिजे. 
अशी मुले पुढे जाऊन स्वतःसाठी, परिवारासाठी,समाजासाठी, गावासाठी, देशासाठी एक आदर्श स्थापित करतात. 
कु.श्रावणी अजित सस्ते पाटील हिने मिळवलेल्या यशाबद्दल स्थानिकां पासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरां तर्फे तिचा सन्मान, सत्कार करण्यात येत आहे व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.