नूतन कन्या प्रशाला सेलू यांच्या वतीने माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन.
शिवाजी शिंदे
(दि. 28 आणि 29 डिसेंबर 2024)
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन.
सेलू : नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्य मिक विभाग यांच्या वतीने माजी विद्यार्थी नी मेळाव्याचेआयोजन करण्यात आलेले आहे. दि.1 ऑगस्ट 1973 रोजी श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला सेलू पालकां च्या आग्रहास्तव स्थापन झाली. नूतन कन्या प्रशाला आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करतआहे .मागे वळून पाहता विद्यार्थी निंच्या यशस्वी वाटचालीनेच नूतन कन्या प्रशाला आज सुवर्ण महोत्सवाच्या शिखरावर विराजमान आहे. आज प्रशालेच्या विद्यार्थिनी विविध सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा इ. क्षेत्रात देश परदेशात नाव उज्वल करत आहेत शाळेने दिलेल्या ज्ञानाची अखंड शिदोरी कायम ठेवत. तेव्हा या गुरु -शिष्य नात्यातील ऋणानुबंध जोपासत नूतन कन्या प्रशालेने माजी विद्यार्थिनी मेळाव्याचे आयोजन दि. 28 आणि 29 डिसेंबर 2024 रोजी नूतन कन्या प्रशालेच्या प्रांगणात करण्याचे निश्चित केले आहे .सर्व क्षेत्रात भरारीघेतलेल्या विद्यार्थिनिंनी पुन्हा एकदा प्रशालेच्या प्रांगणात कृतज्ञापूर्वक येण्याची अपेक्षा आहे. तेव्हा माजी विद्यार्थिनीं नी मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती मुख्याध्यापिका व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी नूतन कन्या प्रशाला यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संपर्क-
श्री .शशिकांत देशपांडे - 9130888002
श्री .कैलास मलवडे
9270721025
श्री. सतीश कुंडीकर
9860394137
सौ. संगीता खराबे
8805311909
टिप्पण्या