52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात खोतवाडी हायस्कुल खोतवाडीचे घवघवीत यश जिल्हास्तरीय निवड
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कुल,खोतवाडीचा 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश मिळवुन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.
न्यु इंग्लिश स्कूल रेंदाळ येथे झालेल्या 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात खोतवाडी हायस्कुल, खोतवाडीने प्राथमिक गटात (5 वी ते 8 वी) द्वितीय क्रमांक मिळवला व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.
विद्यालयातील इयत्ता 7 वी ची विद्यार्थीनी कु.प्रतिज्ञा प्रविण जाधव हिने या विज्ञान प्रदर्शनात नारळ पाणी कलेक्शन हे उपकरण तयार केले होते. या उपकरणासाठी विज्ञान शिक्षिका सौ.घुबडे एस.आर.मॅडम यांनी मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.चुडाप्पा एस.के.सर,विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर तसेच व विज्ञान विभागाच्या प्रमुख सौ.धारवट एम.एम.यांचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या