खेड, आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार" श्री बाबाजी रामचंद्र काळे ,यांचा जाहीर नागरिक सत्कार संपन्न...
खेड पुणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांचा साई कृपा लॉन्स भाम येथे रविवार दिनांक 01/12/24 रोजी सायंकाळी शिवसेना माजी मंत्री संपर्क प्रमुख श्री सचिन भाऊ अहीर , महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांच्या व खेड तालुक्यातील तमाम- मतदार बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत सत्कार समारोह संपन्न झाला.
या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री रामदास( आबा ) घनवटे ,नवनियुक्त आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे व खेड तालुक्यातील मतदार बंधू- भगिनींचे आभार मानले व मी या मतदार संघा च्या विकासासाठी, संपूर्ण जनतेच्या मदतीसाठी पूर्वीही तत्पर होतो व आताही राहीन अशी ग्वाही दिली. शिवसेना माजी मंत्री संपर्क प्रमुख श्री सचिन भाऊ अहिर यांनी श्री बाबाजी काळे यांना मी मतदार संघा च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, गरज भासली तर माझा निधी देईन, पण विकासकार्य थांबले नाही पाहिजे असे ते आपल्या सत्कार समारंभनिमित्त भाषणातून त्यांचे मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमास राष्ट्रीय धर्म हिंदू संगठनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री हंसराज पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सौ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष श्री गोपाळ भालेराव कोषाध्यक्ष श्री संतोष लांडे, व संघटनेचे अन्य पदाधिकाऱ्यांनी खेड तालुक्याचे नवनियुक्त आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खेड मतदार संघातील आलेल्या सर्व मतदार, बंधू भगिनी, युवा वर्ग, वयोवृद्ध यांच्याकडून आमदार श्री बाबाजी काळे सत्कार आभार स्वीकार करत होते. या कार्यक्रमाला भरपूर गर्दी दिसून आली, सर्व कार्यक्रम सुव्यवस्थित व उत्साहात संपन्न झाला...
टिप्पण्या