संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सिआय डी तर्फे करण्याची मागणी.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.    

सकल मराठा समाजा तर्फे निवेदन.

सेलू : दि. 13 मस्साजोग (ता.केज जि.बिड)  येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी मार्फत करून या प्रकरणातील दोषींवरील खटला‌ जलद गती न्यायालया त चालून संबंधित आरोपीला फाशी देण्यात यावी याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडवणीस यांना पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन सेलू व तहसीलदार, तहसील कार्यालय सेलू यांच्यामार्फत आज दि.(13) शुक्रवार रोजी सेलू येथील सकल मराठा समाजातील सर्व समाज बांधवांनी घटनेचा जाहीर निषेध करत आपला रोष व्यक्त करत जो पर्यत न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत.
माऱ्याकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे अश्या विविध मागण्या करत निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर प्रसाद महाराज काष्टे, दत्तात्रय सोळंके, दादासाहेब गाडेकर,बाळकृष्ण पौळ,कपिल पडूळ, ऍड. मगर,बालाजी पौळ, आप्पासाहेब गाडेकर,संतोष राऊत,अभी काकडे, गोविंद शिंदे,पांडुरंग डासालकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी समाज बांधव उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.