पिंपरी चिंचवड येथे सामाजिक कार्यकर्त्यां सौ कल्पना भाईगडे यांच्या उल्लेखनीय कार्याचा होणार सन्मान - कोल्हापूर येथे द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार जिल्हास्तरीय कर्तृत्ववान महिला नारिशक्ती सेवारत्न समाज गौरव पुरस्कारासाठी निवड
पुणे जिल्हयातील पिंपरी चिंचवड येथे सामाजिक कार्यकर्त्यां सौ कल्पना भाईगडे यांच्या उल्लेखनीय कार्याचा होणार सन्मान - कोल्हापूर येथे द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार जिल्हास्तरीय कर्तृत्ववान महिला नारिशक्ती सेवारत्न समाज गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण होईल अशी माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सागर शेळके व पत्रकार कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. एस. जी. पोवार यांनी दिली. सामाजिक कार्यकर्त्यां सौ कल्पना शिवाजीराव भाईगडे यांना जिल्हास्तरीय कर्तृत्ववान महिला नारिशक्ती सेवारत्न समाजगौरव पुरस्कारासाठी निवड झालेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहें. द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळयात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तीचा संस्थाचा पुरस्कार देऊन दिगग्ज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे. टाटा मोटर्स गृहिनी संस्था, बाल संस्कार केंद्र, पार्थ महिला बचत गट, पुणे जिल्हा पोलीस मित्रसंघटना, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी आंदोलन मध्येसहभाग घेऊन सर्व सामान्यांचे विविध प्रश्न सोडणवीन्याचे काम उत्कृष्ट रीतीने पार पाडले.त्याबरोबर रक्तदान शिबिरात सहभागी, मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन, गरजू गरीब विद्यार्थ्यांना- अनाथ, मतीमंद अपंग सस्थाना मदत यासारखे प्रभावी कामे पार पाडल्यामुळे सौ. कल्पना भाईगडे यांची पुरस्कारसाठी निवड झाल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून, मान्यवर, मित्रपरिवार व नाते वाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे..
टिप्पण्या